STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

गावातील लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे की नाही?

*गावातील गरीब शेतकरी खरच माणूस आहे का नाही, ?*

गावातील शेतकरी लोकांनाही सामान्य माणसाप्रमाणे जगण्याचे हक्क आहेत का नाही ?

अजून किती वर्षे गावच्या गाव अशीच दुर्लक्षित राहणार ?

अजून किती वर्षे गावातील माणसे अशीच हालअपेष्टा करीत जगणार ?

शेतकरी गावात राहून चूक करतोय काय ?

सतत गावातील लोकांनी सत्तेपुढे भिकच मागायची काय ?

गावातील शिक्षण व्यवस्था किती वर्षे अशीच कुचकामी राहणार?

गावातील लोकांना चांगल्या आरोग्यव्यवस्था मिळविण्याचा अधिकार आहे का नाही ?

भारत स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष होत आली भारतातील 7 लाख खेडी आजही कमी अधिक प्रमाणात त्याच अवस्थेत का आहेत ?

गावातच का सक्तीचे 12 तास विजेचे लोडशेडिंग केले जाते ?

गावातील तरुण का शहराकडे स्थलांतर होत आहे ?

गावातील शेतकरी का आत्महत्या करीत आहे ?

गावातील शेतकऱ्याच्या मालाला का चांगला हमीभाव मिळत नाही ?

- उत्तर

*कारण गेल्या सत्तर वर्षात सर्व राजकारण्यांनी गावातील या सामान्य माणसाच्या फक्त आणि फक्त वोट बँक म्हणून वापर करून घेतला आणि अजूनही घेत आहेत,*

गावाचा विकास सोडून स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन यासारख्या फक्त पोकळ थापा मारल्या गेल्या, गेल्या कित्येक वर्षात नुसता सामान्य लोकांच्या नावावर भ्रष्टाचार करण्यात आला, प्रत्येक पक्षाने नुसत्या निवडणुकीत थापा मारल्या,

गावाचा संपूर्ण अभ्यास करून कधीही कुणीही त्यासाठी ठोस पायाभूत उपाययोजना केल्या नाहीत,

*गावातील शेतकरी आज संप का करतोय त्याचे उत्तर वरील सर्व प्रश्नात आहे ?*

सर्वाना विनंती आहे की यावर सखोल विचार करून लवकरात लवकर कृती करणं फार गरजेचे आहे, नाहीतर पुढील काळात मोठा उद्रेक झाल्याखेरीज राहणार नाही,

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.