STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

मोदी भक्तांसाठी - विचार तर करा ?

*मोदी भक्तानी कृपया सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या खालील काही प्रश्नाचे उत्तर द्या, व विचार करा ?* 🙏

1⃣ *जागतिक बाजारपेठेत कच्या तेलाचे भाव 48 ते 50 डॉलर प्रति बॅरल असताना म्हणजे जवळजवळ 30 रु लिटर असताना सर्व सामान्य लोंकांसाठी एवढा मोठा भुर्दंड का ???*🔥

2⃣125 करोड जनतेला कॅशलेस व्यवहार करायला व सर्व दैनंदिन व्यवहाराचे हिशोब अत्यंत कठोरपणे राबविण्यास सांगून -
*स्वतः निवडणुकीत 10000 ते 20000 करोड किंवा त्याही पेक्षा जास्त रक्कम मोठं मोठ्या उद्योगपतींकडून लाखो करोडो रु घेऊन याचे बेहिशेबी व्यवहार का व कसे करताहेत ???* 📔

3⃣ दैनंदिन जीवनामध्ये आजही सर्वसामान्य लोकांसाठी सर्व शासकीय कार्यलयात *लाच घेतल्याशिवाय काम होत नाही* यासाठी संसदेमध्ये सर्वानुमते मान्य केलेला, भ्रष्ट्राचाराचा कर्दनकाळ ठरलेला *जनलोकपाल बिल व विधेयक* अजून मंजूर का केले नाही ?⚫

4⃣
-दरवर्षी *2 करोड नोकऱ्या* देण्याची,
-सर्व काळा पैसा बाहेर काढून *15- 15लाख* सर्वांच्या खात्यात जमा होतील,
-अच्छे दिन ,
-*स्वामिनाथन आयोग* पास करून सर्वांचे *7/ 12 कोरे* करतो
अश्या एक ना अनेक निवडणूकित खोट्या व पोकळ घोषणा करून *सर्वसामान्य लोकांचा विश्वासघात* का केला ???🥕🥕🥕

5⃣ आपली व्यवस्था व नियोजन नसताना नोटबंदी व GST असे निर्णय घेऊन सर्वसामान्य लोकांना त्याचा अतोनात त्रास होत आहे, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येक लोकांचे उद्योगधंदे बुडाले, महागाई वाढली,

*GDP 7.5 ची 5.7 झाली, 1 % GDP कमी होने म्हणजे अर्थव्यवस्थेचे 1लाख 30 हजार करोड रु चे नुकसान होणे, त्याप्रमाणे अडीच लाख करोड रु ची आपल्या देशाला हानी पोहचली आहे,याला जबाबदार कोण ???*

जी अर्थव्यवस्था अत्यंत जोमाने व चांगल्या रीतीने चालली होती त्याला आपल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वार्थी प्रवुत्तीने निरर्थक निर्णय घेऊन सर्वसामान्य लोकांना अश्या रीतीने का त्रास देण्यात आला ?🙏

6⃣ *धर्माच्या नावावर, व जातिपातीत सतत जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणे , व वैज्ञानिक व पुरोगामी दृष्टिकोन बाळगणाऱ्या संघटना व व्यक्तींचा जाणीवपूर्वक छळ करून त्यांचा खून करणे व त्याचे निर्लज्जपणे समर्थन करणे,* 🔥
हे तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला कितपत पटतंय व तुम्ही त्याचे समर्थन करता का ?

7⃣ *संपूर्ण देशाचे निर्णय फक्त 2 ते 3 लोकांनी घेणे व ते निर्णय 125 करोड वर लादणे, लोकप्रतिनिधी लोकांचे अस्तित्व संपवून, CBI, RBI, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, CAG यासारख्या स्वायत्त संस्थावर अंकुश ठेवून मनाला येईल असे हुकूमशाहीने निर्णय घेणे, सत्ता विकेंद्रीकरण करण्याची गरज असताना ती ठराविक लोकांच्या हातात घेऊन हुकूमशाही पद्धतीने निर्णयामुळे आपली लोकशाही व संविधान धोक्यात आलेले आहे असं वाटत नाही काय ???*⚫

🙏 *मोदी भक्तांना नम्र विनंती* आहे की,-
✅उतावीळ होऊ नका,
✅यावर सखोल विचार करा,
✅वाचन करा,
✅सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर किती परिणाम झाला आहे ते स्वतः तपासा,
✅तुमच्या आजूबाजूला जे विचारवंत , विविध तज्ञ लोक आहेत त्यांचा सल्ला घ्या,
✅अंधश्रद्धेतून जागे व्हा, आपल्याही घरापर्यंत ही आग अली आहे,
✅अनुभवा आणि मग आपले मत बनवा,🙏

*आणि आपला भारत देश ज्या धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाव, ऐक्य, बलिदान, त्याग, सत्य, अहिंसा, पराक्रमी शूरवीर अश्या चांगल्या गुणांसाठी सर्व जगात प्रसिद्ध आहे, तो असाच राहावा व सर्वजण सुखी समाधानी राहावेत यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करावेत,*🙏🇮🇳🙏

धन्यवाद,
डॉ अमोल पवार,

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.