STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

आजची अस्वस्थ सामाजिक परिस्थिती

*आज समाजात जी काही दुरावस्था झालेली आहे, भ्रष्ट्राचार टोकाला पोहचला आहे, नीतिमत्ता खालावलेली आहे, अनैतिकता वाढली आहे, वाईट प्रथा प्रवूती वाढल्या आहेत, हिंसा, नुसती लुटालूट, चाललेली आहे,*

*आपली भावी पिढी फार मोठ्या अराजकतेकडे चाललेली आहे*

*त्याची कारणे मुख्यतः*

1, सध्या कायद्याची भीती अजिबात उरली नाही, राजकीय दबावाखाली आणि पैशाच्या जीवावर पोलीस यंत्रणा काम करीत आहे,

2, मोठया प्रमाणात न्यायालये, न्यायाधीश, वकील, सुद्धा पैसे घेऊन वर्षे न वर्षे केसेस प्रलंबित ठेवत आहेत, अश्या वेळखाऊ न्यायालयाच्या प्रऊतींमुळे सामान्य लोकांच्या मनात कोणताही आदर किंवा भीती न राहता प्रचंड रोष व चीड तयार झाली आहे,

3, जास्तीत जास्त सरकारी अधिकारी संगनमताने लाच दिल्याशिवाय कामे करीत नाहीत किंवा फक्त राजकीय वरदहस्तने किंवा वशिल्याने कामे होतात, आणि सामान्य माणसाला फक्त हेलफाटे खायला लावले जातात,

4, प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे देऊन मते विकत घेऊन निवडून आलेल्या या अराजक शाहिमध्ये अश्या लोकप्रतिनिधी च्या कडून काय अपेक्षा ठेवणार, तो फक्त वाटलेल्या पैशाचा हिशोब करून अजून पुढच्या निवडणुकीसाठी कसे जास्त पैसे काढता येईल ते पाहत असतो, मते मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन जाती धर्मचा उपयोग करून ,गुंड पाळून दडपशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या अश्या लोकप्रतिनिधींच्या मूळे खऱ्या अर्थाने आपली लोकशाही धोक्यात आली आहे,

5, या सर्व गोष्टींमुळे समाजातील भरडलेली इतर शिक्षित लोक सुद्धा झालेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी अनैतिक कामे करायला लागली आहेत,

6, संपूर्ण समाज हा सध्या दिशाहीन व भरकटलेला आहे,

7, हि जी काही अराजक परिस्थिती उद्भवली आहे त्यासाठी समाजातील चांगल्या सज्ञान माणसाचा तंटस्थपणा व नकारात्मकपणा हेही तेवढेच महत्वाचे कारण आहे,

*हि प्रचंड अराजक परिस्तिथी बदलायची असेल तर एक जबाबदार नागरीक म्हणून खालील विविध गोष्टी करणे गरजेचे आहे*

1, समाजात येण्याऱ्या पिढीवर, युवावर्गावर चांगले आदर्श संस्कार करणे गरजेचे आहे

2, कायदा सुव्यवस्था यावर आपले सतत लक्ष पाहिजे, RTI किंवा माहितीचा अधिकार वापरून सतत माहिती घेतली पाहिजे,

3, तसाच अश्या सर्व शासकीय लोकांची सतत स्टिंग ऑपरेशन सामान्य माणसांनि केली पाहिजेत व त्यांना कोर्टात खेचून त्यांना कठोर शिक्षा केली गेली पाहिजे,

4, स्वतः सर्व नैतिकतेचे व नितीमत्तेचे पालन करून लोकांच्यापुढे चांगले आदर्श निर्माण करून ठेवले पाहिजेत,

5, चांगली टॅलेंटेड आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांना निवडून दिले पाहिजे,

6, बलात्कार, खून, भ्रष्टचार, किंवा इतर अवैध धंदे करणाऱ्या लोकांना अतिशय कमी वेळेत मोठं मोठया शिक्षा केल्या गेल्या पाहिजेत,

*तरच आपली नवीन पिढी चांगल्या वातावरणात शिकेल, नव नवीन तंत्रज्ञान शोधून मानवाला उद्याच्या काळात समर्थपणे जगण्यासाठी नवनवीन उपाययोजना करून चांगली आदर्श पिढी निर्माण होईल*

लेखक
डॉ अमोल पवार, अस्थिरोग तज्ञ पलूस
संस्थापक अध्यक्ष
आदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस,
निमंत्रक, महामार्ग संघर्ष समिती 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.