STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

सोशल मीडिया - एक क्रांती - दुधारी तलवार ?

*सोशल मीडिया - दुधारी तलवार*
*सोशल मीडिया- एक क्रांती*,
*सोशल मीडिया- सामान्य माणसाचा आवाज*
*सोशल मीडिया- समान मतप्रवाह असणाऱ्या लोकांना एकत्र जोडणारा दुवा*

*सोशल मीडिया आणि आपली भावी पिढी व आपले भविष्य याबद्दल थोडस*

सोशल मीडिया म्हणजे फेसबुक,व्हाट्स अँप,ट्विटर यासारखी माध्यमे आणि त्याचा समाजामधील वापर,

*आपण प्रथम सकारात्मक बाजू पाहू*
सोशल मीडियामूळे आपले सर्व दूरदुरचे मित्रमंडळी एकत्र आले,
लांब लांबचे पाहुणे एकत्र आले,
तुमच्या असोसिएशन, संस्था, कॉलेज, इत्यादी ठिकाणची सर्व लोक एकत्र आली,

*फायदे,*

1, तुमच्या कल्पना, विचार मांडण्याचे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे,

2, आपल्या सोशल कामाची किंवा उपक्रमाची माहिती सर्वांच्यापुढे ठेवता येते,

3, तुमच्या समूहाच्या मदतीने तुम्हीे आतापर्यंत अशक्य वाटणाऱ्या कित्येक गोष्टी प्रत्यक्षात सहज शक्य करू शकता, व करीत आहात,

4, मोठमोठ्या थोर लोकांची महान कार्य,त्यांचा इतिहास याची माहिती सहजासहजी उपलब्ध होतेय,

5, शासकीय कामाची , शासकीय योजनांची माहिती अत्यन्त कमी वेळात लोकांच्यापर्यंत पोहचत आहे,

6, आपल्या घरगुती सर्व चांगल्या वाईट कार्यक्रमांची माहिती थेट सर्वांपर्यँत विनायस पोहचवली जाते,

*अश्या विविध सार्वजनिक कार्यासंबंधीची माहिती लवकरात लवकर पोहचविण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर होत आहे, म्हणून याला एक सामाजिक क्रांती झाली आहे असे म्हणले तर वावगं ठरलं जाणार नाही,*

*सोशल मीडियाचे तोटे किंवा चुकीचा वापर*-

1. जाती धर्मसंबंधी तेड निर्माण करून काही समाजकंटक लोक थोड्याश्या प्रसिद्धीसाठी अत्यंत वाईट वापर करतायत,

2, आताच्या वैज्ञानिक युगात काही लोक देवदेव, धर्म, बुवाबाजी, यासारख्या चुकीच्या अंधश्रद्धा पसरविण्यासाठी करीत असतात,

3.काही लोक अपुऱ्या अर्धवट माहितीच्या आधारे कोणतीही शहानिशा न करता अफवा पसरविणारे चुकीचे मेसेज फॉरवर्ड करीत असतात,

4, काही लोक राजकीय स्वार्थासाठी बनावट माहिती किंवा प्रसंग तयार करून त्याचे प्रसारण करीत असतात,

5, काही लोक थोर लोकांच्या नावे किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या नावे आपली वैयक्तिक मते प्रसारित करीत असतात,

*तर सर्वाना नम्र विनंती आहे की तुम्ही सोशल मीडियाचा वापर अतिशय जबाबदार पद्धतीने करावा, व त्याचा वापर जर तुम्ही आपल्या समाजाच्या हितासाठी सतत करीत राहिला तर आपल्या समाजात सोशल मीडियामूळे एक सामाजिक परिवर्तनाची क्रांती घडून आल्याखेरीज राहणार नाही*

धन्यवाद,
डॉ अमोल पवार
संस्थापक, अध्यक्ष
आदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस,
निमंत्रक, महामार्ग संघर्ष समिती 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.