STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

मतदारांचा जाहीरनामा

*गावातील मतदारांचा जाहीरनामा*
🙏🇮🇳🙏

*आपल्या गावाचा सर्वांगीण विकास लोकसहभागाने करायचा असेल तर व आपली लोकशाही ( लोकांचं राज्य- स्वराज ) जिवंत ठेवायाची असेल तर,*

✅ *दारू, मटण, पैसे घेऊन भिकाऱ्यासारखे मतदान करू नका,*

✅ *ग्रामव्यवस्था, पंचायत राज, 14 वा वित्तीय आयोग, ग्रामपंचायतची कामे याचा सखोल अभ्यास असणाऱ्यास मत द्या*

✅5 वर्षासाठी संपूर्ण गावाचा कारभार ज्यांच्याहाती द्यायचा आहे तो त्यासाठी लायक आहे का पहा,

✅ *चांगल्या शिक्षित, निष्कलंक, अभ्यासू व समाजसेवा करणाऱ्या व आपल्या गावाच्या विकासाचे परिपूर्ण नियोजन करणाऱ्या उमेदवारास मत द्या*

✅संपूर्ण गावाचे *सुक्ष्मनियोजन सर्वे* करून त्याप्रमाणे गावाचा सर्वांगीण विकासाचे नियोजन करणाऱ्या उमेदवाऱ्यास मत द्या

✅ *शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी, भूगर्भातील पाण्याची पातळी, माती पाणी परीक्षण, शेतकरी प्रशिक्षण, हवामान केंद्र उभे करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या उमेदवारास मत द्या,*

✅गावातील सर्व *शाळामध्ये* पाणी, लाईट, स्वछता या मूलभूत सोयी बरोबर शहरातील शाळांसारखे डिजिटल वर्ग करून सर्वाना अद्यावत शिक्षण देऊ शकणाऱ्या व तसे नियोजन असणाऱ्या उमेदवारास मत द्या

✅गावातील लोकांच्या चांगल्या *आरोग्यासाठी* संपूर्ण स्वछता व अद्यावत कचरा नियोजन, यासारख्या सुविधा उपलब्ध करून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांच्यासाहयाने सर्वसामान्य लोकांना मोफत आरोग्यउपचाराचे नियोजन व कल्पना असणाऱ्या उमेदवारास मत द्या

✅गावातील सर्व रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, पथदिवे, यासारख्या *मुलभूत गोष्टींचे* अत्यंत पद्धतशीर पणे योग्य नियोजन करणाऱ्या उमेदवारास मत द्या,

✅ *14 वा वित्तीय आयोग, घरपट्टी, पाणीपट्टी, जिल्हा नियोजन निधी, विविध पुरस्कार बक्षिसे, आमदार, खासदार निधी, CSR निधी याचा अत्यंत पारदर्शक पद्धतीने कोणताही भ्रष्टाचार न करता नियोजन करणाऱ्या उमेदवारास मत द्या,*

✅ *अनुसूचित जाती, जमाती* यांच्यासाठी आलेल्या निधीचे अत्यंत योग्य पद्धतीने नियोजन करून लोकांना सर्वसामान्यांच्या प्रवाहात आणणाऱ्या उमेदवारास मत द्या,

✅गावात सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व चौकात *CCTV कॅमेरे* लावणे, अश्या गोष्टीस प्राथमिकता देणाऱ्या उमेदवारास मत द्या,

✅गावात *वाचनालय, व्यायामशाळा,* बांधण्यास प्रोत्साहन देणाऱ्या उमेदवारास मत द्या

✅ *महिला व मुली* यांना योग्य तो मानसन्मान व सुरक्षा देण्यासाठी कटीबद्द असणाऱ्या उमेदवारास मत द्या

✅पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी *वृक्षारोपनाचा* पुढाकार घेणाऱ्या उमेदवारास मत द्या,

✅आपल्या गावाचा आधुनिक GPS तंत्रज्ञान वापरून गावाच्या *जलसंधारण* साठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षित उमेदवाराला मत द्या,

✅आपल्या गावातील दारूचे व गुटख्यांचे दुकान बंद करून *संपूर्ण व्यसनमुक्ती* करू इच्छिणाऱ्या उमेदवारास मत द्या,

✅आधुनिक विज्ञानाचा ध्यास असणारा व बाबा, बुवाबाजी, व इतर कर्मकांड दूर ठेऊन *अंधश्रद्धा निर्मूलन* करू इच्छिणाऱ्या उमेदवारास मत द्या

✅ *लोकसहभागाने, लोकशाही जिवंत ठेऊन, अत्यंत पारदर्शकपणे सर्व अहवाल जनतेसमोर ठेऊन, भ्रष्टाचार न करता कारभार लोकाभिमुख काम करणाऱ्या उमेदवारास मत द्या,* 🙏🇮🇳🙏

शब्दसंकलन व विचार,-

*डॉ अमोल पवार,*
अस्थिरोग तज्ञ, डॉ पवार हॉस्पिटल पलूस.
संस्थापक अध्यक्ष, आदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस
निमंत्रक, महामार्ग संघर्ष समिती
संयोजक- आदर्श येळावी संकल्प ग्रुप
संयोजक- लोकशाही वाचवा, संविधान वाचवा कृतिशील विचारमंच पलूस,

9860111046
orthoap@gmail.com

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.