STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

भारतीय संविधान- अधिकार व कर्तव्ये

🇮🇳 *भारतीय संविधान* 🇮🇳

भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकास राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्ये माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे...

🇮🇳 *मूलभूत अधिकार*- 🇮🇳
(कलम 12 ते 35, भाग 3 मध्ये)

1⃣ *समानतेचा अधिकार* (14 ते 18)
अ. *कायद्यापुढे समानता*-(कलम 14) राज्याने केलेले कायदे सर्वाना समान लागू होतील व सर्वाना कायद्याचे समान संरक्षण मिळेल,

ब. *भेदभाव नसावा* - ( कलम 15)
धर्म, जात, वंश, लिंग, वर्ग किंवा जन्मस्थान या आधारे नागरिकांच्यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

क. *समान संधी* - ( कलम 16) सार्वजनिक सोयीसुविधा, नियुक्ती, पद याबाबतीत सर्व नागरिकांना समान संधी राहील.

ड. *अस्पृश्यता निवारण*-
कलम 17 द्वारे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे, तसेच त्यावर स्वतंत्र कायद्याने बंदी आणण्यात आली आहे व त्यावर फोजदारी गुन्हा होऊ शकतो,

इ. *पदव्या व किताब देणे संपविणे* (कलम 18) द्वारे ब्रिटिष्काळात यामध्ये भेदभाव केला जात होता म्हणून हा कायदा करण्यात आला,
आता हे फक्त राष्ट्रपती पदकांपुरते मर्यादित करण्यात आले आहे.

2⃣ *स्वातंत्र्याचा अधिकार*- (कलम 19 प्रमाणे)
- भाषण व विचार स्वातंत्र्य,
- शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा,
- संस्था किंवा संघटन स्थापन करण्याचा,
- भारतात कुठेही मुक्तपणे फिरण्याच स्वातंत्र्य,
- भारतात कुठेही स्थायिक होण्याचा,
- किंवा कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य....

3⃣ *पिळविणूकीविरुद्ध किंवा शोषणाविरुद्ध अधिकार*( 23, 24)
- बालमजूर याना खाणं, कारखाने अश्या धोक्याच्या ठिकाणी काम लावणे,
- माणसांचा क्रय विक्रय करणे, अश्या विविध पिळविणूकीविरुद्ध किंवा शोषणा विरुद्ध कठोर शिक्षा करण्याची तरतूद घटनेत केली आहे.

4⃣ *धर्मस्वातंत्र्याचा अधिकार* (25 ते 28)
- प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतानुसार कोणताही धर्म स्वीकारण्याचा व प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार असेल,
*(श्रद्धा व उपासनेचे धार्मिक स्वातंत्र्य प्रत्येकाला)*

- परंतु धार्मिक कामासाठी सक्तीची वर्गणी व सक्तीचे धार्मिक शिक्षण यावर बंदी असेल.

5⃣ *सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार*- कलम 29 द्वारे प्रत्येकाला अथवा व्यक्तीसमूहाला आपली स्वतःची भाषा, लिपी अथवा संस्कृती जोपासण्याचा मूलभूत अधिकार आहे,

- तसेच धर्म किंवा भाषा आधारित अल्पसंख्याक जातींना आपल्या पसंतीप्रमाणे शिक्षणसंस्था स्थापून त्या चालविण्याचा अधिकार दिला गेला आहे,

6⃣ *न्यायाचा अधिकार ( घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार)*-
कलम 32 ते 35 मध्ये मूलभूत अधिकारांना संरक्षण देण्यासाठी भारतातील कोणत्याही नागरिकास सर्वोच्च न्यायालयात सुद्धा न्याय मागता येतो,

- *भारतीय घटनेप्रमाणे प्रत्येक व्यक्तीस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय मिळालाच पाहिजे*...

--------------*------------------

*भारतीय संविधानाने आपल्याला वरील जे 6 मूलभूत हक्क दिले आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीयाने एकूण 11 मूलभूत कर्तव्ये पाळलीच पाहिजेत*.

🇮🇳 *मूलभूत कर्तव्ये*- 🇮🇳

1⃣ संविधानाचे पालन करणे व त्याचा आदर ठेवणे,

2⃣ भारताचे राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांचा आदर करणे,

3⃣ समाजात बंधुभाव वाढीस लावणे,

4⃣ भारताची सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे.

5⃣ देशाच्या परंपरेचा व ऐतिहासिक वारशांचा आदर व जतन करणे,

6⃣ सार्वजनिक मालमत्तेचे व पर्यावरणाचे संरक्षण करणे,

7⃣ स्त्रियांचा आदर करणे,

8⃣ हिंसेच्या विरोधात उभे राहणे,

9⃣ वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारने व त्याचा प्रचार व प्रसार करणे,

🔟 देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल त्यावेळी राष्ट्रीय सेवा बजावणे,

1⃣1⃣ 6 ते 14 वर्षातील मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण...

🇮🇳 *थोडक्यात संविधानामूळे*
-पूर्वीची धर्मशाही व राजेशाही संपुष्टात आनली,
-सर्व नागरिकांना समान लेव्हलवर आणले,
-जातीयवाद व अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या,
- अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, व
- सर्वसामान्य माणसावर कोणताही अन्याय किंवा शोषण झाल्यास त्याला न्याय मागण्यांची तरतूद केली गेली आहे.........

*अश्या रीतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने 26 नोव्हेंबर 1949 रोजी या आदर्श व महान भारतीय संविधानामुळे स्वतंत्र, विवेकशील व नव्या भारताचा उदय झाला*...........🇮🇳🙏🇮🇳

*लेख व संकलन*-
डॉ अमोल पवार, 9860111046
लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.