STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

अस्वस्थ समाज व आजची अर्धवट शिक्षणपद्धती

🇮🇳 *अस्वस्थ समाज - सद्य शिक्षणपद्धती*
- डॉ अमोल पवार

   *समाजात वाढत चाललेल्या अराजकतेला, अविश्वासाला, भ्रष्टाचाराला, अंधश्रद्धेला, व्यसनाधीनतेला, धर्मांधतेला व जातीयवादाला फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे? - आदर्श शिक्षणप्रणालीचा अभाव...* एकूणच एक आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर सद्य शिक्षण व्यवस्थेमध्ये फार मोठे मूलभूत व आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे.

    सद्य शिक्षण फक्त पुस्तक व परिक्षापुरत अत्यन्त संकुचित होऊन गेले आहे. शिक्षणाचा भव्य दृष्टीकोन समजून घेणं व तश्या पद्धतीने ते अमलात आणण आज समाजसुधारणेसाठी अत्यन्त महत्वाची गोष्ट आहे.

1⃣ *पुस्तकी शिक्षण*- भाषा, गणित, सायन्स, स्पर्धा परीक्षा यापूरत मर्यादित राहिलेल्या सद्य शिक्षण पद्धतीला आपण पुस्तकी शिक्षण म्हणू.  पण तो फक्त 1/4 भाग आहे असं मी मानतो,

2⃣ *मानवी मूल्यआधारीत आदर्श संस्काराचे शिक्षण*- आज याची समाजाच्या एकूण आरोग्यासाठी फार गरज आहे. आज कोण कोणाचे ऐकेनासे झाले आहे. सर्वत्र स्वैराचार वाढला आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा गैरवापर होताना दिसत आहे, यामुळे वैयक्तिक, कौंटुंबिक व सामाजिक कलह निर्माण होतात दिसत आहे. याला जर आळा घालायचा असेल तर घरामध्ये मुलांनी कसं वागायला पाहिजे, शाळेत कसं वागायला पाहिजे व एकूणच समाजात कसं वागायला पाहिजे, मोठ्याचा आदर व छोट्यांचा सन्मान केला पाहिजे, काय चांगलं काय वाईट आहे याच प्रशिक्षण मुलांना देणं गरजेचं आहे, गांधींनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा, प्रेम, बंधुभाव या मानवी मूल्यांची जोपासना होण्यासाठी मुलांना चांगले मूल्यआधारित आदर्श शिक्षण देणं गरजेचं आहे.

3⃣ *आरोग्य शिक्षण*- स्वतःचे आरोग्य कसे निरोगी ठेवायला पाहिजे यासाठी आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ठराविक गोष्टी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणल्याच पाहिजेत.

4⃣ *शारीरिक शिक्षण*- शरीर निरोगी राहण्यासाठी खेळ, व्यायाम, योगा, ध्यानसाधना अश्या विविध गोष्टींचे शिक्षण आपल्या शिक्षणपद्धती मध्ये सर्वांसाठी सक्तीचे करणे आवश्यक आहे.

5⃣ *संविधानिक शिक्षण*- इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होऊन, व प्रस्थापित राजेशाही संपुष्टात आणून आपला भारत देश ज्यावेळी प्रजासत्ताक झाला, त्यावेळी या भारत देशात नागरिकांना राहण्यासाठी काही नियमावली बनविण्यात आली त्याला आपण भारतीय संविधान म्हणतो,  संविधानाने आपल्याला हक्क व अधिकारांबरोबर काही कर्तव्ये सांगितली, ही आज 99% लोकांपर्यंत पोहोचलीच नाहीत, त्यासाठी संविधानाचे मूलभूत व ठराविक शिक्षण आपल्या भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये समाविष्ट केले गेले पाहिजे.

6⃣ *आहारविषयक शिक्षण*- आपण काय खावे, काय खाऊ नये, किती खावे, याबाबत शास्त्रोक्त अभ्यास शिक्षणामध्ये समाविष्ट करणेही अत्यंत गरजेचे आहे. 

6⃣ *श्रद्धा व अंधश्रद्धा बाबत वैचारिक तर्कनिष्ठ शिक्षण*- दिवसेंदिवस आपल्या समाजात अयोग्य शिक्षणपद्धतीमुळे प्रचंड अंधश्रद्धा, कर्मकांड वाढीस लागली आहेत, तर्कनिष्ठ विचार करून अंधश्रद्धा निर्मूलन करणे आज अत्यन्त महत्वाची गोष्ट होऊन बसली आहे. यासाठी धार्मिक कट्टरता टाळून मुलांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे,

7⃣ *व्यसनमुक्तीचे प्रशिक्षण*- आज समाजामध्ये बऱ्याचश्या कुटुंबाची आर्थिक दुर्दशा होण्याच्या पाठीमागे व्यसनाधीनता ( दारू, सिगारेट, बिडी, तंबाखू, भांग, ड्रग याचे व्यसन ) हे अत्यन्त प्रमुख कारण आहे, व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक, आर्थिक, मानसिक व सामाजिक परिणामांचे शिक्षण हे आपल्या शिक्षण पद्धती मध्ये समाविष्ट करायला हवे.

8⃣ *स्व स्वरक्षणाचे शिक्षण*- स्वतःवर होणाऱ्या आघाताचे, अन्यायाचे, शारीरिक व मानसिक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शारीरिक व मानसिक कुवत वाढीस लागण्याचे मूलभूत शिक्षण देणेही तितकेच महत्वाचे.

9⃣ *व्यावहारीक शिक्षण*- समाजामध्ये राहत असताना प्रत्येक व्यक्तीला असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागते, प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात जिवंत असेपर्यंत कोणत्या ना कोणत्या समस्येने पीडित असतो, बऱ्याच वेळा त्याला त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते, लोकं मानसिक दृष्ट्या खूप त्रस्त झालेली असतात, यासाठी आपल्या शिक्षणपद्धती मध्ये बदल करून व्यावहारिक नागरिकत्वाचे, तसेच विविध प्रशासकीय कामाबद्दल, नियमाबद्दल व्यावहारीक शिक्षण देणे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. उदाहरणार्थ. प्रत्येक नागरिकनानी कोणकोणते टॅक्स भरायला हवेत याची संपूर्ण महिती आपण व्यवसाय सुरू करेपर्यंत नसते यासारख्या विविध गोष्टींची व मूलभूत नियमांची माहिती आपल्या शिक्षणामध्ये केली गेली पाहिजे.

🔟 *समान शिक्षण*- प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, सर्व वर्गाच्या ( गरीब, श्रीमंत) सर्व जातीधर्माच्या मुलांना एकाच छताखाली, एकाच पद्धतीचे अद्यावत व मोफत शिक्षण जर सर्वाना उपलब्ध करू शकलो तर सामाजिक असमानता, आरक्षण यासारख्या गोष्टींचे समूळ निराकरण होईल, व जाणीवपूर्वक वाढविलेला जातीयवाद संपूर्णपणे बंद होईल...

    *जर आपला समाज, आपला देश खऱ्या अर्थाने महान व आदर्श बनवायचा असेल तर वरीलप्रमाणे आपल्या शिक्षण पद्धतीत वरीलप्रमाणे मूलभूत व आमूलाग्र बदल करून एक आदर्श शिक्षण व्यवस्था  निर्माण करणे खूप खूप गरजेचे आहे...*

शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी अजून काही सूचना असतील तर संपर्क करा-

*डॉ अमोल पवार* 9860111046
orthoap@gmail.com
संस्थापक, अध्यक्ष, आदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस ( जिल्हा- सांगली)