STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

सेल्फ विलगिकरण हा एकमेव पर्याय भारताकडे आहे...

✅ *भारताची आरोग्यव्यवस्था लक्षात घेता, संपूर्ण देश लॉकडाऊन करून "सेल्फ Quarantine" ( विलगिकरण) हा फक्त एकमेव उपाय आपल्या भारत देशाकडे आहे.* 🙏

आपल्या भारत देशाला स्टेज 3- Community Spread व स्टेज 4- कोरोना आजाराची भयंकर Epidemic Spread/ महामारी, या दोन्हीही स्टेज आपल्याला अजिबात परवडणार नाहीत, हे लक्षात घ्या... 

*ज्यावेळी एपीडिमिक पसरेल त्यावेळी आपली सरकारी आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाणार आहे... यात शंका नाही.. आपल्या तुटपुंज्या सरकारी आरोग्य यंत्रणेवर भारत देशातील कोरोना साथीची चौथी स्टेज आपण आटोक्यात आणूच शकत नाही, कारण संपूर्ण जगामध्ये आरोग्यसेवेत प्रगत असणाऱ्या अमेरिका, इटली, स्पेन, फ्रांस, जर्मनी सारख्या देशात सध्या काय भयानक परिस्थिती आहे हे आपण पाहतोय, आरोग्यसेवेत भारताचा क्रमांक 102 वा आहे  यावरून व WHO नियमानुसार प्रत्येक लाख लोकांच्या पाठीमागे कमीत कमी 13 ते 15 व्हेंटिलेटर पाहिजेत, पण आपल्या भारत देशात फक्त 2.5 व्हेंटिलेटर आहेत... ही खुप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे...*

आपण चौथ्या टप्प्यात कोणाचाही सहजासहजी जीव वाचवूच शकणार नाही.. *त्यामुळे या कोरोना आजाराच्या संपूर्ण गोष्टीला कृपया सिरियसली घ्या*... 

म्हणूनच आपण फक्त स्वतःला व आपल्या कुटुंबाला पुढील दोन ते तीन आठवड्यासाठी सेल्फ Quarantine (विलगिकरण) केले तरच वाचू शकू नाहीतर विनाश अटळ आहे.... 

*एक डॉक्टर म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण तिसरी व चौथी स्टेज अजिबात सहन करू शकणार नाही.. त्यामुळे लवकरात लवकर स्वतः व आपल्या कुटुंबाला पुढील 2 ते आठवडे आपल्या घरातच सुरक्षित ठेवा... सूचना पाळा, वैयक्तिक स्वच्छता पाळा, बाहेर पडू नका, गर्दी तर अजिबात करू नका*🇮🇳🙏🇮🇳

- डॉ अमोल पवार

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.