STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

कोरोना बद्दल भारत सरकारची महत्वपूर्ण माहिती

🇮🇳 *भारत सरकारने कोरोना वायरस संबंधित प्रसिध्द केलेली माहिती मराठीत* 👇

हेल्पलाईन नंबर - 011 23977046
टोल फ्री नंबर - 1075
इमेल - ncov2019@gov.in
व्हाट्स अप साठी - 9013151515

1⃣ *कोरोना बाधित व्यक्तीला होणारे त्रास*
🤒 अति प्रमाणात ताप येणे
😐श्वसनास त्रास होणे
🤧 कोरडा खोकला
😫छातीत गच्च होणे
😨 डोकेदुखी
👃सर्दी (नाक वाहणे)
😷 न्युमोनिया
🌡️ अस्वस्थ वाटणे
💉 किडनी फेल होणे

या तक्रारी असू शकतात पण या तक्रारीवरून या आजाराचे निदान करणे कठीण आहे, तरीही आपल्याला अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा- 👇 https://www.mohfw.gov.in/FINAL_14_03_2020_ENg.pdf

तसेच AIIMS चा हा 👇 व्हिडीओ पाहू शकता https://youtu.be/E8-UoeWewFI

2⃣ *कोरोना बाधित व्यक्तीकडून हा आजार कसा संक्रमित होतो*- 

♦️ कोरोना बाधित व्यक्तीच्या नाकातून किंवा तोंडातून थुंकलेल्या, खोकल्यातून किंवा शिंकलेल्या तुषारातून हा कोणत्याही पृष्ठभागावर पडू शकतो. 

♦️ अश्या पृष्ठभागाचा संपर्क आपल्या हाताला आल्यास व तोच हात जेंव्हा आपण आपल्या तोंडाला, नाकाला किंवा डोळ्याला स्पर्श केल्यास कोरोना वायरस संक्रमित होऊ शकतो.

♦️हातात हात घेतल्याने किंवा अतिजवळच्या स्पर्शाने सुद्धा हा संक्रमित होत आहे. 

अधिक माहितीसाठी लिंक👇
https://youtu.be/0MgNgcwcKzE

3⃣ *कोरोना वायरसचा आजार होऊ नये किंवा पसरू नये यासाठी*

✅ आपले हात सातत्याने साबण व पाण्याने 7 स्टेप्स मध्ये 20 ते 40 सेकंद साठी व्यवस्थित धुवावे, किंवा अल्कोहोल कन्टेन्ट असलेले हँड सॅनिटायझर वापरा.https://youtu.be/EJbjyo2xa2o

✅ खोकताना आपले नाक व तोंड कपड्याने किंवा मास्क ने झाकावे, किंवा शिंकताना आपल्या कोपऱ्याच्या कोहनी मध्ये शिंकावे किंवा खोकावे, जेणेकरून आपल्या हातावर ते तुषार उडणार नाहीत,
https://youtu.be/f2b_hgncFi4

✅ जवळचा संपर्क किंवा स्पर्श टाळा, खोकणाऱ्या व शिंकणाऱ्या व्यक्तीपासून 1 ते 2 मीटर ( 5 ते 6 फूट ) अंतर ठेवावे. https://youtu.be/mYyNQZ6IdRk

✅ बाहेरच्या देशातून जाऊन आलेल्या किंवा संक्रमित भागातून आलेल्या व्यक्तीपासून दूर राहा.व अश्या व्यक्तीला सलग 14 दिवस सर्वांपासून वेगळे ठेवावे... https://www.mohfw.gov.in/AdditionalTravelAdvisory1homeisolation.pdf

✅ Quarantine जर करायला सांगितले असेल तर सर्वांनी त्याप्रमाणे स्वतःला इतरांपासून दूर ठेवावे.https://www.mohfw.gov.in/Guidelinesforhomequarantine.pdf

4⃣ *अजून सर्व सविस्तर माहितीसाठी या वेबसाईटवर क्लीक करा* 👇
https://www.mygov.in/covid-19

----------------*----------------*---------------

स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, स्वतःला गर्दीपासून दूर ठेवा, वरीलप्रमाणे वैयक्तिक स्वच्छतेचे नियम पाळा, आपली व आपल्या कुटुंबाची प्रतिकारशक्ती वाढवा, इतरांना ही  अधिकृत माहिती द्या, आपण प्रत्येकाने जर याप्रमाणे काळजी घेतली तरच हे कोरोनाचे मानवजातीवर आलेले संकट दूर होईल, नाहीतर खूप मोठी किंमत मोजावी लागेल हे लक्षात घ्या. मला आपली सर्वांची काळजी आहे म्हणूनच भारत सरकारच्या वेबसाईटवर इंग्रजीत असणारी माहितीचे मराठीत भाषांतर करून आपल्यापुढे ठेवत आहे..

धन्यवाद...🙏🇮🇳🙏

- *डॉ अमोल पवार*  
अस्थीरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते. पलूस ( सांगली)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.