STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

कोरोना संसर्गबाबत काळजी कशी घ्याल? - डॉ अमोल पवार


              कोरोना विषयी कोणकोणती काळजी घ्यावी? - 
                      ( माहिती संकलन )
           डॉ अमोल पवार , ९८६०१११०४६
 अस्थिरोग तज्ञ, डॉ पवार हॉस्पिटल पलूस, जिल्हा- सांगली,                 सामाजिक व राजकीय कार्यकर्ते 
                      पुणे पदवीधर उमेदवार

भारताची आरोग्यव्यवस्था लक्षात घेता, संपूर्ण देश लॉकडाऊन करून "सेल्फ Quarantine" ( विलगिकरण) हा फक्त एकमेव उपाय आपल्या भारत देशाकडे आहे. 

आपल्या भारत देशाला स्टेज 3- Community Spread व स्टेज 4- कोरोना आजाराची भयंकर Epidemic Spread( महामारी) या दोन्हीही स्टेज आपल्याला अजिबात परवडणार नाहीत, हे लक्षात घ्या... 

ज्यावेळी एपीडिमिक पसरेल त्यावेळी आपली सरकारी आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाणार आहे... यात शंका नाही.. आपल्या तुटपुंज्या सरकारी आरोग्य यंत्रणेवर भारत देशातील कोरोना साथीची चौथी स्टेज आपण आटोक्यात आणूच शकत नाही, कारण संपूर्ण जगामध्ये आरोग्यसेवेत प्रगत असणाऱ्या अमेरिका, इटली, स्पेन, फ्रांस, जर्मनी सारख्या देशात सध्या काय भयानक परिस्थिती आहे हे आपण पाहतोय, आरोग्यसेवेत भारताचा क्रमांक 112 वा आहे  यावरून व WHO नियमानुसार प्रत्येक लाख लोकांच्या पाठीमागे कमीत कमी 13 ते 15 व्हेंटिलेटर पाहिजेत, पण आपल्या भारत देशात फक्त 2.5 व्हेंटिलेटर आहेत... ही खुप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे...

तसेच आपल्याकडे प्रगत देशाच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात सद्या कोरोना टेस्टिंग होत आहे, प्रत्येक 10 लाख लोकसंख्ये साठी इटली, दक्षिण कोरिया, अमेरिका यासारख्या देशात 5000 ते 7000 टेस्टिंग चे प्रमाण असताना आपल्याकडे फक्त दर 10 लाख लोकसंख्येला फक्त 18 रुग्णांची कोरोना टेस्टिंग होत आहे, 

आपली लोकसंख्या 137 करोड आहे, तसेच आपल्याकडे स्वच्छते विषयी व सर्वच आरोग्य सेवेशी निगडित सोयी व उपाययोजना यामध्ये खूप कमतरता आहे, समाजात खूप मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणा आहे, 

आपल्या सद्य तुटपुंज्या आरोग्यसेवेच्या आधारे, कोरोनाच्या चौथ्या टप्प्यात ( एपीडिमिक स्प्रेड- महामारीच्या स्टेज मध्ये)  कोणाचाही सहजासहजी जीव वाचवूच शकणार नाही.. त्यामुळे या कोरोना आजाराच्या संपूर्ण गोष्टीला कृपया खूप खूप सिरियसली घ्या... म्हणूनच आपण फक्त स्वतःला व आपल्या कुटुंबाला पुढील दोन ते तीन आठवड्यासाठी किंवा लागेल तेवढे दिवस सेल्फ Quarantine (विलगिकरण) केले तरच आपण व आपले कुटुंब वाचू नाहीतर विनाश अटळ आहे.... 

एक डॉक्टर म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण तिसरी व चौथी स्टेज अजिबात सहन करू शकणार नाही.. त्यामुळे लवकरात लवकर स्वतः व आपल्या कुटुंबाला पुढील 2 ते 3आठवडे आपल्या घरातच सुरक्षित ठेवा... खाली भारत सरकारने who ने दिलेल्या सूचना पाळा, वैयक्तिक स्वच्छता पाळा, घराबाहेर जिवात पडू नका, स्वतःला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा, आपल्या देशाला व आपल्या संपूर्ण मानवजातीला वाचवा. अशी माझी कळकळीची नम्र विनंती आहे.


भारत सरकारने कोरोना वायरस संबंधित प्रसिध्द केलेली माहिती मराठीत 👇

हेल्पलाईन नंबर - 011 23977046
टोल फ्री नंबर - 1075
इमेल - ncov2019@gov.in
व्हाट्स अप साठी - 9013151515

1⃣   कोरोना बाधित व्यक्तीला होणारे त्रास
🤒 अति प्रमाणात ताप येणे
😐श्वसनास त्रास होणे
🤧 कोरडा खोकला
😫छातीत गच्च होणे
😨 डोकेदुखी
👃सर्दी (नाक वाहणे)
😷 न्युमोनिया
🌡️ अस्वस्थ वाटणे
💉 किडनी फेल होणे
या तक्रारी असू शकतात पण या तक्रारीवरून या आजाराचे निदान करणे कठीण आहे, तरीही आपल्याला अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा- 👇 https://www.mohfw.gov.in/FINAL_14_03_2020_ENg.pdf
तसेच AIIMS चा हा 👇 व्हिडीओ पाहू शकता https://youtu.be/E8-UoeWewFI

2⃣   कोरोना बाधित व्यक्तीकडून हा आजार कसा संक्रमित होतो- 

♦️ कोरोना बाधित व्यक्तीच्या नाकातून किंवा तोंडातून थुंकलेल्या, खोकल्यातून किंवा शिंकलेल्या तुषारातून हा कोणत्याही पृष्ठभागावर पडू शकतो. 

♦️ अश्या पृष्ठभागाचा संपर्क आपल्या हाताला आल्यास व तोच हात जेंव्हा आपण आपल्या तोंडाला, नाकाला किंवा डोळ्याला स्पर्श केल्यास कोरोना वायरस संक्रमित होऊ शकतो.

♦️हातात हात घेतल्याने किंवा अतिजवळच्या स्पर्शाने सुद्धा हा संक्रमित होत आहे. 
अधिक माहितीसाठी लिंक👇
https://youtu.be/0MgNgcwcKzE

3⃣   कोरोना वायरसचा आजार होऊ नये किंवा पसरू नये यासाठी

✅ आपले हात सातत्याने साबण व पाण्याने 7 स्टेप्स मध्ये 20 ते 40 सेकंद साठी व्यवस्थित धुवावे, किंवा अल्कोहोल कन्टेन्ट असलेले हँड सॅनिटायझर वापरा.https://youtu.be/EJbjyo2xa2o

✅ खोकताना आपले नाक व तोंड कपड्याने किंवा मास्क ने झाकावे, किंवा शिंकताना आपल्या कोपऱ्याच्या कोहनी मध्ये शिंकावे किंवा खोकावे, जेणेकरून आपल्या हातावर ते तुषार उडणार नाहीत,
https://youtu.be/f2b_hgncFi4

✅ जवळचा संपर्क किंवा स्पर्श टाळा, खोकणाऱ्या व शिंकणाऱ्या व्यक्तीपासून 1 ते 2 मीटर ( 5 ते 6 फूट ) अंतर ठेवावे. https://youtu.be/mYyNQZ6IdRk

✅ बाहेरच्या देशातून जाऊन आलेल्या किंवा संक्रमित भागातून आलेल्या व्यक्तीपासून दूर राहा.व अश्या व्यक्तीला सलग 14 दिवस सर्वांपासून वेगळे ठेवावे... https://www.mohfw.gov.in/AdditionalTravelAdvisory1homeisolation.pdf

✅ Quarantine जर करायला सांगितले असेल तर सर्वांनी त्याप्रमाणे स्वतःला इतरांपासून दूर ठेवावे.https://www.mohfw.gov.in/Guidelinesforhomequarantine.pdf

4⃣   अजून सर्व सविस्तर माहितीसाठी या वेबसाईटवर क्लीक करा 👇
https://www.mygov.in/covid-19


कोरोना बाबत अत्यन्त महत्वपूर्ण माहिती 😷

1⃣ कोरोना विषाणूचा आकार 125 नॅनो मायक्रोन एवढा असल्याने तो सहजासहजी कोणत्याही मास्क किंवा कपड्यातून पुढे प्रसारित होत नाही. त्यामुळे कोणताही मास्क किंवा रुमाल/ कपडा आपण आपल्या नाकासमोर धरल्यास आपल्याकडून किंवा समोरच्याकडून विषाणू संक्रमित होणार नाही, परंतु तज्ज्ञांच्या मते प्रत्येकाने मास्क वापरण्याची काहीच गरज नाही. जी व्यक्ती कोरोना बाधित आहेत, जी लोक त्याची सेवा करतायेत तसेच हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे खूप गरजेचे आहे,  आपण वापरलेले मास्क व्यवस्थित नष्ट ( डिसपोझ ) करणेही तितकेच गरजेचे. 

2⃣ कोरोना हा विषाणू कोरोना बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून, थुंकीतून, शिंकलेल्या तुषारामधून (ड्रॉप्लेट्स) संक्रमित होतो, जमिनीवर/ किंवा कोणत्याही पृष्ठभागावर पडलेला विषाणू 1 ते २ दिवस  व कपड्यावर पडलेला  हा विषाणू १२ ते २४  तास जिवंत राहू शकतो. म्हणून अश्या सर्व सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी आपण शक्यतो जाणे टाळणे, सार्वजनिक ठिकाणी कोण कोण येउन गेलेले आहे हे कोणीही सांगू शकत नाही, शेकडो, हजारो लोकांनी सार्वजनिक ठिकाणी स्पर्श केलेला असू शकतो म्हणून गर्दीच्या आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका, तसा काही प्रसंग आल्यास त्याठिकाणी आपण कोणत्याही वस्तूला डायरेक्ट स्पर्श करण्याचे टाळा..

3⃣  वरीलप्रमाणे संक्रमित काळात अश्या कोरोनाबाधीत पृष्ठभागास आपल्या हाताचा संपर्क झाल्यास तो आपल्या हातामार्गे नाक, तोंड, डोळे अश्या मार्गाने आपल्या शरीरात शिरू शकतो, व तिथे तो संक्रमित होतो व तो व्यक्ती करोना बाधित करतो, म्हणून सातत्याने आपले हात कोपरापासून बोटापर्यंत ( 7 स्टेप्सने) 20 ते 30 सेकंद पर्यन्त स्वच्छ धुणे गरजेचे आहे, तसेच वरील कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श केला असल्यास निदान लगेच हँड सॅनिटायझर वापरा.. 

4⃣ सर्वच ताप, सर्दी खोकला आलेल्या लोकांना कोरोना असेल असे अजिबात नाही, आपल्याकडे साधा फ्लू, किंवा घश्याचे इन्फेक्शन असू शकते, तात्काळ आपल्या डॉक्टरांच्या कडे जाऊन त्याचा इलाज करावा,  सध्या अलीकडेच बाहेरील देशात जाऊन आलेला व्यक्ती, किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती तसेच ज्यांना  जास्त प्रमाणात ताप, सर्दी, कोरडा खोकला व श्वसनासाठी त्रास होणे ही लक्षणे कोरोनाची आहेत, अश्या सर्व लोकांनी आपली तपासणी सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन करावी व स्वतःला 14 दिवसांसाठी Quarantine करावे, ( म्हणजे दुसऱ्यांच्या पासून वेगळं ठेवावं) आजारी 70ते 80% कोरोना बाधित रुग्णांना काहीच औषधे घेण्याची गरज नसते, ते स्वतःच्या प्रतिकारशक्ती च्या साह्याने बरे होऊ शकतात. काही लोक नेहमीची फ्लूची ( symaptamatic ) औषधे घेऊन व इतर काळजी घेऊन बरे होऊ शकतात, कोरोना वर कोणतीही ठोस उपचार पद्धती अजूनही विकसित झालेली नाही, परंतु ज्यांना श्वसनाचा त्रास होतो आहे त्यानी तात्काळ कोरोना रुग्णांनसाठी  तयार केलेल्या हॉस्पिटल किंवा Isolataed स्वतंत्र वॉर्ड मध्ये उपचार करून घ्यावेत, 20% लोकांना हॉस्पिटलचे उपचार घ्यावे लागतात व एकूण 5 % लोकांना व्हेंटिलेटर ची गरज लागते, साधारणपणे Mortality rate मृत्यू दर हा अतिशय कमी म्हणजे फक्त 3ते 5 % एवढाच आहे, त्यामुळे कोणीही घाबरून न जाता, अतिशय पॅनिक न होता किंवा अस्वस्थ न होता, येणाऱ्या परिस्थितीला सकारात्मकपणे काळजी व उपचार घेऊन बरे होऊ शकतो व हा कोरोना वायरस पळवून लावू शकतो. सध्या आपण दुसऱ्या स्टेज मध्ये आहोत, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपण सर्वच जणांनी सध्या होम quarantine होणं फायदेशीर ठरणार आहे, शक्यतो घराबाहेर पडू नका, गरजेपुरते जीवनावश्यक गोष्टी साठी काळजी घेऊन घराबाहेर पडा. 

5⃣  तसेच तज्ञाच्या मते हा कोरोना विषाणू ३० ते ३२℃ सेल्सिअसच्या वरच्या उष्ण तापमानात राहू शकत नाही, नष्ट होतो, म्हणून सतत  गरम पाण्याच्या गुळण्या करण फायदेशीर, थंड आईस्क्रीम किंवा फ्रीज मधील पदार्थ थोडे दिवस खाणे टाळावे, 

6.  आपला देश, राज्य, जिल्हा, तालुका किंवा आपलं गाव जर कोरोना मुक्त करायचे असेल तर प्रत्येकानेच जबाबदारीने व शिस्तबद्ध वागले पाहिजे, स्वतः आपण काळजी घेतली पाहिजे, तसेच स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची व इतरांना संसर्ग होऊ नये याची आपण सर्वांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे,

   आज आपल्या मानवजातीवर आलेले हे संकट आपण सर्वांनी एकत्र मिळून, जबाबदारीने काळजी घेऊन, दूर करायचे आहे हे लक्षात घ्या... उगाचच पॅनिक किंवा अस्वस्थ होऊ नका, तसेच बेफिकीरही होऊ नका, योग्य काळजी घेऊन आपण सर्वांनी यावर मात करूया...🙏


चला, करोना समजून घेऊ !

• करोना काय आहे? 
करोना एक प्रकारचा विषाणू आहे. त्याचे नामकरण नॉव्हेल करोनाव्हायरस २०१९-एनसीओव्ही असे केले आहे. 

• करोनाचे उगमस्थान कोणते? 
करोना विषाणूच्या फैलावाला वुहान या अत्यंत गजबजलेल्या शहरातून सुरुवात झाली. वुहान हे जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्याचे केंद्रबिंदू समजले जाते. नेमक्या त्याच शहरातून या आजाराला सुरुवात झाली. 

• करोना कुठे व किती वेळ जिवंत राहू शकतो ?
करोना हा विषाणू कोरोना बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून, थुंकीतून, शिंकलेल्या तुषारामधून (ड्रॉप्लेट्स) संक्रमित होतो, जमिनीवर किंवा कोणत्याही पृष्ठभागावर पडलेला विषाणू 1 ते 2 दिवस व कपड्यावर पडलेला हा विषाणू 12 तास जिवंत राहू शकतो. कोरोना विषाणू 30 ते 32 ℃सेल्सिअसवरच्या उष्ण तापमानात राहू शकत नाही,  नष्ट होतो. 

• करोना कुणाला होतो ?
करोना विषाणू सर्वच वयोगटाला बाधित करतो. तरी, लहान मुले व वृद्धांना या विषाणूपासून जास्त धोका आहे. बहुतेक करोनाचे बळी हे वृद्ध आहेत. अशा व्यक्ती ज्यांना रक्तदाब, मूत्रपिंड, कॅन्सर, मधुमेहाचा आजार आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांना करोना होण्याची दाट शक्यता आहे. 

• करोना प्राण्यांना होतो का ? 
प्राण्यांना करोना झाल्याचे अजून निदर्शनास आलेले नाही. करोना बकरी, कोंबडी यांच्यामुळे होत नसल्याने मांस, अंडी खाता येऊ शकतात.   

• करोना विषाणू कसा पसरतो ?
      वरीलप्रमाणे संक्रमित काळात अश्या कोरोनाबाधीत पृष्ठभागास आपल्या हाताचा संपर्क झाल्यास तो आपल्या हातामार्गे नाक, तोंड, डोळे अश्या मार्गाने आपल्या शरीरात शिरू शकतो, तिथे तो संक्रमित होतो व असा व्यक्ती करोना बाधित होतात. 

• करोना स्पर्शाने होतो का ?
     करोना स्पर्शाने होत नाही. 

• करोना लघवी, विष्ठेद्वारे होतो का ? 
लघवी किंवा विष्ठेद्वारे होतो कि नाही असे कुठे निदर्शनास आले नाही. 

• करोनाची लक्षणे काय आहेत ? 
कोरडा खोकला, सर्दी, घसा तीव्रतेने दुखणे, ताप 100 डिग्री फॅरेनहिटहून अधिक असणे. अंगदुखी, श्वसनाला त्रास होणे. उलट्या व जुलाब, खोकल्यावाटे रक्त पडणे. 

• करोनावर काही औषध आहे का ? 
कोरोनावर अजून ठोस औषध अजून उपलब्ध नाही. 

• ज्या व्यक्तीत लक्षणे आढळली आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी?
सर्वच ताप, सर्दी खोकला आलेल्या लोकांना करोना असेल असे अजिबात नाही, आपल्याकडे साधा फ्लू, किंवा घश्याचे इन्फेक्शन असू शकते, तात्काळ आपल्या डॉक्टरांच्या कडे जाऊन त्याचा इलाज करावा. ज्यांना श्वसनाचा त्रास होतो आहे त्यानी तात्काळ कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या हॉस्पिटल किंवा Isolated स्वतंत्र वॉर्ड मध्ये उपचार करून घ्यावेत. 

• आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीमध्ये वरील लक्षणे आढळल्यास काय करावे ? 
त्या व्यक्तीला तत्काळ डॉक्टरकडे जाण्याचा, मास्क घालण्याचा सल्ला द्यावा. आपण स्वतः व्यक्तीपासून अंतर राखावे. गर्दीत जाण्याचे टाळावे. 

• सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी ? 
वेळोवेळी आपले हात कोपरापासून बोटापर्यंत (7 स्टेप्सने) 20 सेकंद हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी कोण-कोण येउन गेले आहे हे कोणीही सांगू शकत नाही. शेकडो, हजारो लोकांनी सार्वजनिक ठिकाणी स्पर्श केलेला असू शकतो, म्हणून गर्दीच्या आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका. 

• करोना बरा कसा होऊ शकतो का ? त्याची उदाहरणे आहेत का? 
  चीनमधील ४४००० करोना बाधित लोकांच्या आकडेवारीमधून हे लक्षात येते कि एक हजारातल्या ९ जणांचा बळी जातो हे खरे असले तरी ९९१ लोक बरे होऊन घरी जात आहेत. मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवून करोना बरा होतो.

• करोनावर घरगुती उपाय कोणते?
हळद मिठाच्या पाण्याने गुळणी करणे, कोमट पाणी प्या. हात-पाय स्वच्छ धुवा. आपला परिसर घर स्वच्छ ठेवा. आपली आणि आपल्या शेजार्यांची काळजी घ्या. सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहेत, त्यावर विश्वास ठेऊ नका. अधिकृत माहिती असल्याशिवाय ती व्हाटस अप्प, फेसबुकवरून पसरवू नका. काळजी घ्या, सतर्क रहा !

माहिती संकलन -

डॉ अमोल पवार , ९८६०१११०४६
अस्थिरोग तज्ञ, डॉ पवार हॉस्पिटल पलूस, जिल्हा सांगली,
 सामाजिक व राजकीय कार्यकर्ते 
  पुणे पदवीधर उमेदवार

🇮🇳  एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने, महाराष्ट्र राज्याचा जबाबदार नागरिक म्हणून, आज कोरोनाच्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पलूस, जिल्हा सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते व अस्थिरोग तज्ञ "डॉ. अमोल पवार,"यांचेकडून कोरोना साथीच्या उपाययोजनेसाठी #एक #लाख #रूपये ( 1,00,000 रु) देणगी देण्यात आली...

आपणही मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये खाली👇 दिलेल्या लिंकवर जाऊन आपापल्या परीने मदत करून कोरोना आजाराचे जागतिक संकट दूर करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती...🙏
https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/DonationOnlineForm.action

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.