STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आपण चीन, दक्षिण कोरिया, तैवान सारख्या देशाकडून काही धडे घेऊ शकतो का ?

🇮🇳 *भारतात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी चीन, तैवान व दक्षिण कोरिया कडून आपण नेमका कोणता धडा घेऊ शकतो?*👇

1⃣ *हॉटस्पॉटस ओळखून त्याठिकाणी सर्वच घराघरात जाऊन किंवा ऑनलाईन पध्दतीने प्रत्येक व्यक्तीचा आरोग्य सर्वे करणे*- म्हणजे काय- तर प्रत्येकाच्या आरोग्य विषयक लक्षणांवरून आपण त्यांची विभागणी करणे- *पांढरी यादी* (कोणतेही लक्षण नसलेले लोक), *पिवळी यादी* (कमी लक्षणे दिसणारे लोक), *लाल यादी* ( मध्यम ते अति प्रमाणात लक्षणे दिसणारे रुग्ण) 

2⃣ *टेस्टिंग ( तपासणी/ चाचणी)*- 
जास्तीत जास्त लोकांची तपासणी केल्याशिवाय आपण नेमक्या लोकांना आयसोलेशन किंवा Quarantine करू शकणार नाही, म्हणून 

पहिल्यांदा सर्व *लाल यादीत* समाविष्ट असणाऱ्या सर्व लोकांचे तात्काळ टेस्टिंग करून लगेच त्यांचे *आयसोलेशन* ( विलगिकरण) करणे, त्यातील क्रिटिकल पेशंट ओळखून त्यांना *आय सी यु मध्ये ऍडमिट* करणे, ठराविक Ards पेशंट्सना व्हेंटिलेटर लावणे, या नेमकेपणा साठी जास्तीत जास्त लोकांचे प्रथम टेस्टिंग होणं गरजेचे, 

     त्यांनतर टेस्टिंगच्या क्षमतेनुसार *पिवळ्या यादीतील* लोकांचे टेस्टिंग करणे, गरज भासल्यास त्यांना *होम quarantine अलगिकरण किंवा हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन बेडस असल्यास विलगिकरण* करणे.

     *पांढऱ्या यादीतील* लोकांच्यावर सुद्धा सातत्याने लक्ष ठेवणे, हॉटस्पॉट भागातील लोकांना जोपर्यंत सर्व पेशंट ठीक होत नाहीत तोपर्यंत त्यांना *सेल्फ Quaratine*  करून संपूर्ण लॉक डाऊन करणे. 

3⃣ *उपचार - Quarantine/ Hospital Isolation / ICU Admission-* 

लाल यादीतील लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून, आय सी यु किंवा आयसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवून उपचार करणे, ARDS च्या पेशंट ना व्हेंटिलेटरवर ठेवणे, 

पिवळ्या यादीतील लोकांना आयसोलेशन वॉर्ड किंवा strict Home Quarantine करणे, 

पांढऱ्या यादीतील लोकांच्या वरती सातत्याने लक्ष ठेवून त्यांना सर्व रुग्ण बरे होत नाहीत तोपर्यंत लॉक डाऊन करून ठेवणे, 

4⃣ वैयक्तिक स्वच्छता, हाताची स्वच्छता, सोशल डिस्टनसिंग,अश्या इतर सर्व काळजी लॉक डाऊन पिरियड मध्ये घायच्याच आहेत...

*चीन, दक्षिण कोरिया यासारख्या देशात त्यांनी हॉटस्पॉट ओळखून त्याठिकाणी कठोरपणे वरीलप्रमाणे उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणला आहे, आपणही अश्या प्रमाणे, गाव, तालुका किंवा जिल्हा पातळीवर अश्या रीतीने अत्यन्त नियोजनबद्ध काम करून कोरोनाला पळवून लावू,* 

हॉटस्पॉट वगळता टप्याटप्याने इतर भागात लॉक डाऊन कमी करता येईल, व सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यावरच सर्वत्र पूर्वीसारख्या सर्व उद्योगधंदे, दुकाने, वाहतूक चालू करण्यात यावी...

- *डॉ अमोल पवार* 
अस्थिरोग तज्ञ, डॉ पवार हॉस्पिटल पलूस
व सामाजिक कार्यकर्ते, पलूस, जिल्हा सांगली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.