STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा

🙏 *आरोग्यम धनसंपदा !* 🙏
आपले प्रत्येकाचे आरोग्य हेच आपलं धन व सर्वस्व आहे हे लक्षात घ्या...

*आज 7 एप्रिल "जागतिक आरोग्य दिनाच्या" निमित्ताने आपल्या सर्वांचे आयुष्य आरोग्यदायी, सुखी, समृद्धी व  आनंददायी व्हावे यासाठी आपण व आपल्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा💐*

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपण सर्वांनीच आरोग्यविषयक किती काळजी घेतली पाहिजे हे कळून चुकले आहे. यासाठी *मी माझ्या ब्लॉगमधून व  www.dramolpawar.in या वेबसाईट च्या माध्यमातून  कोरोना विषयी काय काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी जनजागृती करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहे*...

    कोरोना Covid19 हा व्हायरस आपल्या श्वसनसंस्थेवर आघात करतो, 100 पेशंट मधील जवळजवळ 80% पैकी 50 ते 60% लोकांना काहीही त्रास होत नाही, त्यांना कोरोना झालेले सुद्धा कळत नाही, 20 ते 30% रुग्णांना सर्दी, खोकला, ताप अश्या थोड्या तक्रारी येतात, म्हणजे 80% लोकांना अजिबात घाबरायचे कारण नाही, राहिलेल्या 20% लोकांच्या पैकी फक्त 5% ते 10% लोकांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते, राहिलेल्या 15% लोकांना हॉस्पिटल उपचाराची गरज भासते...कोरोनाचा मृत्युदर हा 3 ते 5% च्या आसपास आहे...

      *त्यामुळे सर्वांनी एकदम घाबरून न जाता, पॅनिक न होता, तक्रारी असल्यास पटकन आपली टेस्ट करून घेणे, स्वतःला सेल्फ qurantine अलग ठेवणे, स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणे हे महत्त्वाचे आहे, B कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटामिन C युक्त आहार किंवा याच्या गोळ्या घेऊ शकता, पुरेशी झोप, ताणतणाव रहित जीवन, पुरेसा व्यायाम आपल्याला कोरोना पासून दूर ठेवू शकतो,* 

जी वयस्कर लोक आहेत व ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, कँसर, किंवा असे दीर्घकालीन आजार आहेत, त्यांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे, या वयोगटातील लोकांना जास्त धोका असल्याचे म्हटले आहे, तरीही स्वतःला आजूबाजूच्या जगापासून दूर ठेवून आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचा आपण प्रयत्न करावा ही माझी नम्र विनंती आहे... ( टीप- परदेशात 80, 90 वर्षाची लोक सुद्धा यातून कोरोनामुक्त झाल्याची खूप उदाहरणे आहेत त्यामुळे खूप काळजी करू नये.)

*पुन्हा एकदा आपण सर्वाना व आपल्या कुटुंबियांना "जागतिक आरोग्य दिनाच्या" खूप खूप शुभेच्छा*💐

- *डॉ अमोल पवार*
अस्थिरोग तज्ञ, डॉ पवार हॉस्पिटल पलूस
सामाजिक व राजकिय कार्यकर्ते, 
*पुणे पदवीधर उमेदवार*
www.dramolpawar.in

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.