STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

डॉ अमोल पवार यांचेकडून पलूस तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, सफाई कामगार, पोलीस व पत्रकार यांना N95 मास्कचे मोफत वाटप


🇮🇳 *N95 मास्क - एक आरोग्य कवच*- डॉ अमोल पवार

N95 मास्क म्हणजे कोरोना विरुद्ध लढणाऱ्याची एक प्रकारची ढालच, कोरोना व्हायरस पासून 99% सुरक्षा देणारे PPE ( Personal Protective Equipment म्हणजे N95 मास्क...) हे N95 मास्क आरोग्यसेवेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वापरलेच पाहिजेत असे WHO चे नियम आहेत, परंतु आपल्याकडे त्याचा भयंकर तुटवडा असल्याने याचा आपल्याकडे वापर खूप कमी आहे, तसेच ICMR च्या नियमाप्रमाणे आरोग्यसेवेत काम करणारा एक व्यक्ती जवळजवळ 400 निरोगी लोकांना कोरोना पसरवू शकतो... त्यामुळे आरोग्यसेवेत काम करणारे सर्व आरोग्य कर्मचारी व त्यांना मदत करणारे इतर सर्वजण यांची सुरक्षा तर महत्वाची आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचे आहे की त्यांच्या मार्फत आपल्या शहरात इतर लोकांना हा कोरोना पसरवू नये म्हणून N95 मास्क हे आरोग्यकवच आरोग्यसेवेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वापरणे अत्यन्त महत्वाचे आहे....

आपलं गाव, आपलं शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी, कोरोनाच्या लढाईत आपला जीव पणाला लावून सद्य काळात अहोरात्र काम करणारे आपल्या पलूस शहरातील सर्व डॉक्टर्स, नर्स, स्टाफ, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सफाई कामगार, पोलीस व पत्रकार या सर्वानाच N95 मास्क हे आरोग्य कवच मोफत देण्याचे अत्यन्त महत्वपूर्ण काम पलूसचे सामाजिक कार्यकर्ते व अस्थिरोग तज्ञ डॉ अमोल पवार यांनी केले आहे...

तसं पाहिलं तर N 95 मास्क ची किंमत 200 ते 250 रु प्रति मास्क आहे, परंतु सध्या आपल्या भागातच नव्हे तर संपूर्ण जगात या N95 मास्कचा भयंकर मोठा तुटवडा आहे, आपल्या जिल्ह्यात हे N95 मास्क कुठेही मिळत नाहीत, अश्या वेळेत आपल्या शहराच्या भल्यासाठी डॉ अमोल पवार यांनी स्वतः एक लाख रुपये खर्च करून, एकूण 500 N95 मास्क, पुण्याहून डायरेक्ट डिस्त्रीबुटर कडून अंबुलन्सच्या साहयाने मागवून घेणे, हे अत्यन्त जिकिरीचे काम डॉ अमोल पवार यांनी केलेले आहे...

आज पर्यंत आपल्या पलूस शहरात कोरोनाचा अजिबात शिरकाव झालेला नाही, तसेच अजूनही तो कोरोना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पसरवू नये यासाठी डॉक्टरांनी केलेले हे काम अतुलनीय आहे. डॉक्टरांच्या या कामाबद्दल पलूस परिसरात त्यांचे कौतुक होत आहे...

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.