STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

आता आपणा सर्वांना कोरोना बरोबरच जगायला शिकलं पाहिजे...


😁 आता आपणा सर्वांना कोरोना बरोबरच जगायला शिकलं पाहिजे...
                           - डॉ अमोल पवार 

       WHO जागतिक आरोग्य संघटनेच्या 13 मे रोजीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांचे प्रवक्ते मायकल रायन यांनी सर्व जगाला एक संदेश दिला आहे की, हा कोरोना Covid19 व्हायरस हा बरेच दिवस, महिने किंवा बरीच वर्षे आपल्या वातावरणात राहणार आहे, कदाचित तो इतर विषाणू सारखा कायमचाच या आपल्या जीवसृष्टीचा भाग होऊन राहू शकतो, तो कदाचित कधीच नष्ट होणार नाही, त्यामुळे आपल्याला आता कोरोना बरोबरच जगायला शिकलं पाहिजे....

     अगदी 5000 वर्षांपासून B.C 3000 ( Before Christ) पासून आपल्या या पृथ्वीवर प्रत्येक शतकात कोणत्या ना कोणत्या विषाणूच्या महामारीने प्रचंड मोठा नरसंहार केला आहे. अगदी 1890 ते 1895 साली आपल्या भारतात प्लेगच्या साथीने लाखो लोकांचा मृत्यू झालेला होता, 1918-1919 च्या काळात अमेरिका- युरोप या भागात स्पॅनिश फ्लू या विषाणूच्या महामारीने आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठा नरसंहार झाला होता, त्यावेळी या व्हायरसची लागण जवळजवळ 50 करोड लोकांना झाली होती व त्यामध्ये एकूण 5 करोड लोकांचा बळी गेला होता, अलीकडे 2008-9 ला आलेला स्वाइन फ्लूने सुद्धा 3 ते 4 लाख लोकांचा बळी घेतलेला आहे, 1981 पासून HIV नावाचा विषाणूने आजतागायत जवळजवळ 25 मिलियन (2.5 करोड) लोकांचा बळी घेतलेला आहे, यातून आपल्याला एवढाच बोध घ्यायचा आहे की मानवजातीवर सातत्याने कित्येक विषाणूंनि हमला केलेला आहे, इतिहास अस सांगतो की मानवाने सतत आपल्या अचाट बुद्धिमतेच्या कौशल्यावर या सर्व महामारीवर मात केलेली आहे, आता सुद्धा आपण या कोरोनाला घाबरून न जाता, याला धाडसाने सामोरे जाऊन यातूनही मार्ग काढलाच पाहिजे...आणि निश्चितच मनुष्य प्राणी यातून मार्ग काढणार यात कोणालाही शंका नाही...आणि म्हणूनच जोपर्यंत यावर उपाय, लस औषधे निघत नाहीत तोपर्यंत आपल्याला सर्वोत्तम काळजी घेऊन कोरोनाबरोबर राहायला हवे, 

    आजपर्यंतच्या सर्व वायरस पेक्षा हा Covid 19 वायरस अतिसंक्रमशील असल्याने सर्व जगभर शेकडो देशांनी *लॉक डाऊन* हा पर्याय निवडला होता, काहीअंशी कोरोनाचे संक्रमण संथपणे होण्यासाठी आपल्याला फायदा झालेला दिसतो आहे, तसेच लॉक डाऊन मुळे आपली आरोग्ययंत्रणा सुसज्ज करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळाला आहे. परंतु या 10 आठवड्याच्या नियोजनशून्य लॉक डाऊन मुळे कित्येक गरीब मजूरांचे अन्नावाचून खूप हाल झालेले आहेत, भूकमरी, त्यांचा शारीरिक व मानसिक त्रास कैकपटीने वाढला आहे, सर्व उद्योगधंदे ठप्प झालेले आहेत,  सम्पूर्ण अर्थव्यवस्था ढेपाळली आहे, लॉक डाऊन हा तात्पुरता इलाज होता, आता आपल्याला कोरोनाबाबत सर्व गोष्टी समजुन घेऊन यातून बाहेर यायलाच लागेल, पुन्हा आपले सर्वांचे जीवन पटरीवर आणायला लागेल, नाहीतर कोरोनापेक्षा भूकमरीने जास्त जीव जातील हे वास्तव आहे, हे आता आपल्याला मान्य करावेच लागेल, मग आता करायचे तरी काय ? 👇

    कोरोना बरोबर जीवन जगायचे म्हणजे आपल्याला घरामध्ये, घराबाहेर व आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी निश्चितच खूप काळजी घेऊन हे जीवनचक्र चालू करायला लागेल, यासाठी खालील त्रिसूत्री कायमस्वरूपी आपल्याला आपल्या जीवनाचा भाग करून घ्यायला लागेल, 

M- मास्क घालणे 😷
D - डिस्टनसिंग ( 2 मीटर अंतर ) ➡️🗣️
H - हँड वॉशिंग🙌

      तसेच शक्यतो घराबाहेर गेल्यावर कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श न करणे, स्पर्श झाल्यास सतत सॅनिटायझरने हात निर्जंतुक करणे हेही तितकेच महत्वाचे...

       याबरोबरच रोजची जीवनशैली आरोग्यदायी बनवणे हेही तितकेच महत्वाचे, यामध्ये शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रोटेन व व्हिटॅमिनयुक्त असा संतुलित आहार घेणे, रोज कमीत कमी अर्धा एक तास व्यायाम करणे व  पुरेशी,शांत झोप घेणे या गोष्टी आहेत. तसेच मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मेडिटेशन, योगा, प्राणायाम यासारख्या गोष्टी आता आपल्या जीवनाचा भाग करायला लागतील, तसेच आपली *प्रतिकारशक्ती* वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे,भविष्यात कोणत्याही औषधांपेक्षा आपली ही  मजबूत प्रतिकारशक्तीच आपल्या कामी येणार आहे, दारू तंबाखू यासारख्या व्यसनांनपासून दूर रहा, फास्टफूड इत्यादी बाहेरचे खाणे टाळा व घरच्या घरी स्वछपणे केलेला सकस व संतुलित आहार घेणे महत्वाचे👍

     घराबाहेर व व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या बरोबर आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा कसे राहायचे व काय काय काळजी घ्यायची याचे शास्त्रीय ट्रेनिंग देऊन, सर्वांसाठी योग्य ते सर्व equipment उपलब्ध करून अत्यन्त काळजीपूर्वक वरीलप्रमाणे MDH या सर्व सूचना पाळून शक्य तेवढा व्यवसाय करणे आता आपल्या आणि संपूर्ण समाजाच्या आर्थिक चक्राच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे...

    चला तर मग आपण सर्व सूचनांचे पालन करून अत्यन्त आत्मविश्वासाने या कोरोनाला सामोरे जाऊया, आजपर्यंतच्या मानवी इतिहासात इतर विषाणू बरोबरच आपण जगत आलो आहोत, तर आताही सर्वोच्च काळजी घेऊन या कोरोना बरोबरच जगायला शिकूया, आणि नवीन आरोग्यविषयक तंत्रज्ञानाच्या साहयाने कोरोनाचा संपूर्ण पाडाव करून आपण आपले जीवन सुसह्य करूया*...🙏

धन्यवाद 

- डॉ अमोल पवार 
अस्थिरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते 
पुणे पदवीधर उमेदवार 
पलूस ( सांगली)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.