STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

कोरोना लढाईत यशस्वी ठरलेले "दिल्ली मॉडेल" नेमके काय आहे?




🇮🇳 *दिल्ली मध्ये अस काय वेगळं केले की त्याठिकाणी कोरोना आटोक्यात आलेला आहे?*- काय आहे दिल्ली मॉडेल ?😷

1️⃣ *कोरोना वरिअर्स लोकांचा योग्य सन्मान* - कोरोना ड्युटीवर काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांना 5 स्टार हॉटेल्स मध्ये राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली, त्यांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करण्यात आल्या, मोठ्या प्रमाणात N95 मास्क आणि PPE किट्स ची उपलब्धता करून सर्वात प्रथम त्यांच्या सुरक्षतेची काळजी घेण्यात आली. या कोरोनाच्या लढाईत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. अश्याप्रकारे कोरोना ड्युटीवर काम करणाऱ्या सर्व कोरोना वारीअर्स लोकांचा विश्वास संपादन करून मोठा सन्मान करण्यात आला.

2⃣ *आरोग्यव्यवस्था बळकट करण्यात आली*- गेल्या 5 वर्षांपासूनच सार्वजनिक सरकारी आरोग्य क्षेत्रात बजेटच्या 13 ते 14% गुंतवणूक करून नवीन एकूण 2500 बेडची विविध हॉस्पिटल्स उभारण्यात आली होती. CT MRI सारख्या गोष्टी मोफत करण्यात आल्या होत्या. 600 मोहल्ला क्लीनिक्सच्या साह्याने प्राथमिक आरोग्यव्यवस्था सक्षम करण्यात आलेली होती. सर्वानाच मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात आलेली होती. याचा कोरोना काळात खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. कोरोना काळात राज्य सरकारने 10000 बेडस पासून 15000 बेडस पर्यन्त क्षमता वाढवली. केंद्र सरकारशी समनव्य साधत अजून केंद्र सरकारची 10000 बेडस असे एकूण 25000 बेडची व्यवस्था करण्यात आली. फक्त बेडस नाहीतर ऑक्सिजन सहित सर्व मूलभूत गोष्टींची पूर्तता करण्यात आली.

3⃣ *सुशिक्षित, प्रामाणिक, पारदर्शक व संवेदनशील लीडरशिप*- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार, सर्व विरोधी पक्ष, मीडिया, सर्व सामाजिक संस्था, हॉटेल्स, व्यापारी यांच्याशी योग्य तो सर्वसमावेशक समन्वय साधून सर्व लोकांचा सहभाग व सहकार्य घेऊन ठोस उपाययोजना केली व त्याचे काटेकोरपणे पालन केले. 1 जून नंतर कोणतेही लॉक डाऊन न करता, कोरोनाच्या काळात फालतू राजकारणाला महत्व न देता अत्यन्त संयमाने आरोग्य क्षेत्रातील तज्ञ लोकांचा सल्ला घेत, वेळेवर खूप मोठे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, यासाठी बाकीच्या देशातील कोरोना लढाईचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर करण्यात आला.

4⃣ *कोरोना लढाई*-

✅ कोणतेही लॉक डाऊन न करता, 10 जून ते 15 जुलैच्या *फक्त 1 महिन्याच्या कालावधीत Rt PCR व रॅपिड अँटीजनच्या लाखो टेस्टस करण्यात आल्या*. दिल्लीच्या 2 करोड जनतेचा घराघरात जाऊन चोख आरोग्य सर्वे करण्यात आला, कोरोना संशयित लाखो लोकांचे रॅपिड अँटीजन तपासण्या करण्यात आल्या.

✅ जास्तीत जास्त पॉझिटिव्ह पेशंटना घरातच उपचाराची व्यवस्था करून देण्यात आली. संपूर्ण भारताला दिशा देणारी *होम आयसोलेशन* दिल्लीमध्ये 1 जून पासूनच सुरुवात करण्यात आली. घरात उपचार घेणाऱ्या रुग्णांना 28000 पल्स ऑक्सिमिटर वाटण्यात आले, त्यांच्याबरोबर डॉक्टर्स लोकांचा योग्य समनव्य ठेवण्यात आला,

✅लक्षणें असणाऱ्या व ऑक्सिजन लेव्हल कमी येणाऱ्या रुग्णांना तात्काळ *ऑक्सिजन बेडस* असणाऱ्या सरकारी व खाजगी हॉस्पिटल्स मध्ये ऍडमिट करण्यात आले, रॅमिडीसीविर सारखी महागडी औषधे मोफत उपलब्ध करण्यात आली, CT स्कॅन व इतर महत्वाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, डॉ सरीन सारख्या तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने *प्लाझ्मा थिरेपी* प्रत्यक्षात आणण्यात आली, *प्लाझ्मा बँक* बनविण्यात आली. हे सर्व महागडे आरोग्य उपचार जास्तीत जास्त रुग्णांवर सरकारी हॉस्पिटल्समध्ये मोफत करण्यात आले. तिथे कोणताही गोंधळ माजवून दिला गेला नाही. *कोरोना अँप* द्वारे सर्व हॉस्पिटलच्या बेडसवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात आले व गरजू लोकांना वेळेत अंबुलन्स सारखी व्यवस्था उपलब्ध करून खूप नियोजनबद्ध अद्यावत उपचार करण्यात आले.

✅अश्या प्रकारे नियोजनबद्ध उपचार करून आजतागायत 90% रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. अश्या प्रकारे कमीत कमी वेळेत लाखो टेस्टिंग करून पॉझिटिव्ह पेशंटना विलगिकरण करून लक्षणे असणाऱ्या पेशंटना सर्वोत्तम उपचार देऊन कोरोना आटोक्यात आणण्यात आला.

5⃣ *अर्थकारण रुळावर आणले*-
1 जून नंतर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढूनही दिल्लीमध्ये 1 जूननंतर कोणताही *लॉक डाऊन न करता*, सोशल डिस्टनसिंग व मास्क लावणे याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लोकांचे प्रबोधन करण्यात आले. सर्व उदयोगधंदे, दुकाने व इतर व्यवसाय चालू ठेवण्यासाठी योग्य ती मदत करण्यात आली. बेरोजगार लोकांसाठी *रोजगार मेळावा* लावण्यात आला. दिल्लीची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी व्यापारी उद्योजक यांच्याशी सातत्याने स्वतः बैठका घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येणाऱ्या संकटाला कसे सामोरे जायचे याचे एक उत्तम व आदर्श उदाहरण सर्व भारत देशाला घालून दिले आहे. देशातील प्रत्येक राज्याने प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे योग्य नियोजन केले तरच आपण कोरोनावार विजय मिळवू शकू...
🇮🇳🙏🇮🇳

*माहिती व शब्दसंकलन*
- डॉ अमोल पवार
9860111046

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.