STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

कोरोनाची लढाई ही लोकचळवळ बनवूया


🌐 *कोरोनाच्या या जागतिक महामारीच्या लढ्यात समाजातील प्रत्येक नागरिकाने सामील झाले तरच आपण ही लढाई जिंकू नाहीतर विनाश अटळ आहे*🙏

♦️ कोरोनाची लढाई ही जागतिक महामारी आहे, सध्या ज्याप्रमाणे कोरोनाग्रस्त पेशंट्सची व मृत्यूची संख्या वाढत आहे, यामध्ये संपूर्ण सरकारी यंत्रणा अपुरी पडत आहे, आता ही लढाई कोण्या एकट्याची किंवा फक्त प्रशासनाची लढाई उरली नाही तर ही आता आपल्या सर्वांची, जनतेची लढाई झाली आहे हे लक्षात घ्या. *भविष्यात स्वतःला व आपल्या मुलाबाळांना, कुटुंबियांना चांगल्या प्रकारे जीवन जगायचे असेल तर आपण काही कर्तव्ये पाळलीच पाहिजेत* 🙏

✅ *कोरोनाच्या या जागतिक लढाईत एक जबाबदार नागरिक म्हणून आपण खालील कर्तव्ये प्राणपणाने पाळलीच पाहिजेत*-

1️⃣ घराच्या बाहेर मास्क लावल्याशिवाय पडू नका...असे कोण मास्क न लावलेले लोक आढळल्यास त्याला *मास्क लावण्याची विनंती करा* व मास्क न लावण्याचे दुष्परिणाम सांगा.

2⃣ घरात व बाहेर आपले *हात* सातत्याने कमीत कमी *40 सेकंद धुवा,* किंवा सतत हँड *सॅनिटायझरचा* वापर करा,

3⃣ *दोन मीटर सोशल डिस्टनसिंगचे* कठोरपणे पालन करा.

4⃣ *गर्दीच्या सर्व ठिकाणी जाणे टाळा.*

5⃣ आपण स्वतः काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या व इतरांना काळजी घ्यायला भाग पाडा. *ताप, खोकला, श्वसनास त्रास इत्यादी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टर्सना दाखवून तात्काळ कोरोना टेस्टिंग करून घ्या.ही लक्षणे अजिबात अंगावर काढू नका, लवकरात लवकर निदान होऊन, कोरोनाचे सर्वोत्तम उपचार घेतल्यास आपण आपला जीव वाचवू शकतो*

6⃣ डॉक्टर्स, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर *सर्व कोरोना वारीअर्स यांचा योग्य तो आदर राखा,* काही तक्रार असल्यास आपण योग्य त्या सनदशीर मार्गाने सोडवाव्यात.

7⃣ कोरोना पॉझिटिव्ह असल्यास स्वतः विलगिकरण व्हा, व इतरांनी कोरोना सदृश व पॉझिटिव्ह पेशंट यांच्यावर लक्ष ठेवा, कंटेंटमेंट झोन मधील लोकांच्यावर लक्ष ठेवा. जेणेकरून या आजाराचे माणसाकडून माणसाकडे होत असलेले संक्रमण टाळता येईल, या *दुष्टचक्राची चेन कुठेतरी खंडित करणे गरजेचे.*

8⃣ आपल्या आसपास *कोरोना सदृश्य लक्षणे* असणाऱ्या लोकांना तात्काळ कोविड सेंटर्स वरती उपचार घेण्यास भाग पाडा, ऑक्सिजनचे प्रमाण चेक करून, ऑक्सिजनचे प्रमाण कमी असणाऱ्या लोकांना तात्काळ हॉस्पिटल्समध्ये दाखल करा.

9️⃣ आपल्या आजूबाजूच्या, गल्लीतील किंवा वार्डातील सर्व लोकांचे रोजच्या रोज *ऑक्सिजनचे प्रमाण पाहण्याची पल्स ऑक्सिमिटरच्या साहयाने व्यवस्था करा.* व ज्यांचे Spo2 95% पेक्षा खाली आहे अश्या सिरीयस पेशंटना तात्काळ आय सी यु असणाऱ्या ठिकाणी ऍडमिट करा. त्यासाठी लागेल ते सहकार्य करा. N95 मास्क व इतर PPE वापरूनच हे सर्व सामाजिक काम करा.

🔟 *अफवांना बळी पडू नका*, चुकीची माहिती इतरांना देऊ नका, सध्या प्रशासनावर प्रचंड मोठा ताण आहे, सध्याच्या काळात एकमेकांची उणीदुणी न काढता, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करणे, सर्व सूचना पाळणे व सर्वाना पाळायला लावणे खूप खूप महत्त्वाचे आहे,

✅ *कोरोनाची लढाई ही सर्वसामान्य जनतेची लढाई झाली पाहिजे*, 135 करोड जनतेने एकत्रित येऊन ठरविल्यास हा कोरोना कधीच पळून जाईल. जोपर्यंत सर्वसामान्य जनता या कोरोनाच्या लढाईत सामील होत नाही तोपर्यंत आपण अजिबात यशस्वी होणार नाही हे लक्षात घ्या, त्यासाठी आपल्या *सर्वांचा सकारात्मक सहभाग महत्वाचा*.🙏

- डॉ अमोल पवार
9860111046
सामाजिक कार्यकर्ते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.