STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

🇮🇳 कोरोना (CoVid 19) आजाराच्या टेस्टिंग व उपचाराबद्दल समज गैरसमज..

1️⃣ *टेस्टिंग कोणी करून घेणे गरजेचे आहे?* - ज्यांना ताप, खोकला, श्वसनाचा त्रास यापैकी लक्षणे असल्यास, जी लोक Co morbid हाय रिस्क वयस्कर कॅटेगरी मध्ये येतात ती लोक, पॉझिटिव्ह पेशंटच्या जवळच्या संपर्कातील ट्रेस केलेली लोक, सर्व आरोग्य कर्मचारी व कंटेंटमेंट झोन मधील सर्व शंकास्पद लोक यांची तपासणी करून घ्यायला पाहिजे,

2⃣ *टेस्टिंग्जचे प्रकार*- *RT PCR* ही अधिकृत चाचणी आहे, पण त्याची मर्यादा व लागणारा जास्तीचा वेळ ओळखून आता *रॅपिड अँटीजन* तपासणी मोठ्या प्रमाणात सुरू केली गेली आहे, लक्षणे असणाऱ्या पेशंट मध्ये जरी रॅपिड अँटीजन चाचणी निगेटीव्ह आली तर त्या व्यक्तीची RT PCR करावी अश्या ICMR चे नवीन नियम आहेत
      तसेच समूह संसर्ग पाहण्यासाठी व सीरोसरविलन्स म्हणून *अँटिबॉडी टेस्ट* करू शकता, एखाद्याला covid होऊन गेला असेल तर यामध्ये अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह येते.. मुंबई मध्ये 57% व दिल्ली मध्ये 35% लोकांच्यात कोरोना होऊन गेला आहे असा निष्कर्ष काढण्यात आला व यावरून समूह संसर्ग पाहण्यात आला, 

3⃣ *सर्वांनी आपला आजार अंगावर न काढता ताबडतोब तपासणी टेस्टिंग्ज करून घ्यावी*.. या आजाराची लक्षणे असताना, अंगावर काढणाऱ्या कित्येक लोकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झालेले आहे, त्यांना वाचवणं शक्य होत, पण वेळेत टेस्टिंग करून उपचार न करू शकल्याने कित्येक लोकांचा जीव गमवावा लागला आहे... 

4⃣ *टेस्टिंग बाबत खूप अफवा पसरविण्यात आलेल्या आहेत*. मुद्दामहून पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले जातात, पॉझिटिव्ह रुग्णांच्या मागे प्रशासनाला, हॉस्पिटलला दीड लाख रुपये मिळतात, ह्या निव्वळ अफवा आहेत, यामध्ये काहीही तथ्य नाहीत. असे बऱ्याच जिल्हाधिकारी लोकांनी स्पष्ट केलेले आहे.

5⃣ जे जे देश यातून यशस्वी झाले आहेत, त्या सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करून घेतले आहे, कारण टेस्टिंग केल्या शिवाय तुम्हाला पॉझिटिव्ह पेशंट ओळखता येत नाहीत, *जोपर्यंत आपण असे पॉझिटिव्ह पेशंट शोधून त्यांना विलगिकरण करीत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने खूप मोठ्या प्रमाणात इतर सर्वसामान्य व्यक्तींना संसर्ग केलेला असतो* आपल्या भारत देशात कमी टेस्टिंग केल्यामुळेच या आजाराचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, म्हणून जास्तीत जास्त टेस्टिंग करून असे पेशंट 14+7=21 दिवस पूर्ण विलगिकरण करून कम्युनिटी पासून दूर ठेवले पाहिजेत.

6⃣ *टेस्टिंग केलेल्यांच्या पैकी 80% लोकांना काहीही लक्षणे नाहीत*. त्यांना कोणतीही स्पेशल उपचाराची गरज भासत नाही, परंतु असे पेशंट्स शक्य असल्यास आपापल्या घरातच स्वतःला *होम आयसोलेशन* करून उपचार करून घेऊ शकतात. *त्यामुळे याला घाबरू नका*. 100 मधील 95 पेशंट बरे होत आहेत ही सकारात्मक बाब कायम आपल्या डोक्यात ठेवा.. लक्षणे असलेल्या  ठराविक 10 ते 15%  हाय रिस्क पेशंट्सना अतिदक्षता विभागात ऑक्सिजन व इतर महत्वाची औषधे देऊन बरे केले जाते. आणि त्यांचा जीव वाचवला जातो... 

8⃣ *सोशल स्टिगमा* - पॉझिटिव्ह रुग्णांबाबत समाजात वाळीत टाकण्याच्या भीतीने व उपचारासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्तीपासून दूर राहण्याच्या भीतीने लोक टेस्टिंग करून घेत नाहीत. यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाच्या बरोबर सौहार्दपूर्ण संबंध ठेवून हे संपूर्ण सामाजिक वातावरण चांगलं ठेवण्याच प्रबोधनाचे काम सर्वांनीच आणि प्रशासनाने विविध माध्यमातून केले पाहिजे.

9️⃣ *जास्तीत जास्त टेस्टिंगचे फायदे* - युरोप, दक्षिण कोरिया, जपान यासारख्या देशांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करून व पॉझिटिव्ह पेशंट आयसोलेशन करून कोरोना आटोक्यात आणला आहे, या देशांच्या मध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांचे टेस्टिंग्ज करून घेतले आहे, *आपल्याकडे हा आजार वाढण्याचे मूळ कारणच - कमी प्रमाणात केलेल्या टेस्टिंग्ज हेच आहे*..

🔟 *मध्यम व तीव्र लक्षणे असणाऱ्यां कोरोना रुग्णांसाठी जास्तीत जास्त ऑक्सिजन बेडची उपलब्धता करणे हे अतिशय महत्वाचे*- 80% कोरोना रुग्णांना काहीच लक्षणे नसणाऱ्या लोकांना होम आयसोलेशन किंवा CCC कोविड केअर सेंटर अश्या ठिकाणी उपचार घेऊ शकतात.. या व्यतिरिक्त मध्यम व तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन बेडस असणाऱ्या ठिकाणी उपचार करणे आवश्यक आहे, म्हणून कोरोना रुग्णांमधील मृत्यूदर कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त ऑक्सिजन बेड निर्माण करून त्यांच्यावर सर्वोत्तम उपचार करणे हाच एकमेव उपाय आहे...

त्यामुळे सर्वाना माझी नम्र विनंती आहे की आपण टेस्टिंग्ज व उपचाराबाबत गैरसमज दूर करावेत व कोरोनासदृश्य कोणतीही लक्षणे असल्यास तात्काळ टेस्टिंग करून घ्यावेत... कृपया अंगावर आजार काढू नये 🙏

- *डॉ अमोल पवार*
सामाजिक कार्यकर्ते, सांगली

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.