STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

🇮🇳 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आता घरच्या घरी उपचार शक्य ( Home Isolation) 😷आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ८० टक्के कोरोना बाधित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे या सर्वांचे आता गृहविलगीकरण करुन उपचार करणे शक्य होणार आहे. *अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व ज्यांचे ऑक्सिजन लेवल 95% पेक्ष्या जास्त आहेत अश्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना त्यांच्या घरामध्ये योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या घरी विलगीकरणाचा पर्याय* उपलब्ध आहे.

😷 *होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक सूचना*- 👍

✅ *वैद्यकीय अधिकाऱ्यांनी* रूग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर तपासून तो अति सौम्य व लक्षणे नसलेला आहे. हे प्रमाणित केल्यानंतर गृह विलगीकरणाबाबतची माहिती देतील.

रुग्णांसाठी खेळती हवा असलेली आणि *स्वतंत्र स्वच्छतागृह असलेली खोली असणे*. 
*घरातील काळजी घेणारी व्यक्ती २४ तास उपलब्ध आवश्यक आहे*. नसल्यास रुग्णाची व्यवस्था कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येईल. 
*एक थर्मामिटर व पल्स ऑक्सिमिटर घरात असणे गरजेचे* 🌡️

✅ गृह विलगीकरणानंतर पुढील दहा दिवस रुग्णांची नियमित तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत फोनद्वारे करण्यात येईल. 📲
   
*तपासण्या- रोज शरीराचे तापमान ( Temp.), नाडीचे ठोके( Pulse) व ऑक्सिजन लेवल ( SPO2)  याचे रोजच्या रोज रेकॉर्ड ठेवावे लागेल* व ते संबंधित डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांना कळवावे लागेल.

✅ *दहा दिवसांमध्ये कोणतेही लक्षण न आढळल्यास रुग्ण गृह विलगीकरण संपवू शकतो*. विषेश बाब म्हणजे विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. 

*उपचार* - Tab. Paracetamol, Tab Vit C, Tab B Complex vitamins, Tab Zinc इत्यादी औषधे पेशंटच्या गरजेप्रमाणे सांगितली जातात. 

✅ घरातील कोणीही व्यक्ती (५५ वर्षापेक्षा जास्त वय असलेले) इतर आजार, उच्च रक्तदाब, मधुमेय, ह्दयविकार, जुनाट यकृत, फुप्फूस, मूत्रपिंडाच्या रूग्णांची *कोरोनाचा रुग्ण बरा होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी.* 😷

✅ आरोग्य सेतू ॲप असणे आवश्यक. तसेच नोटिफीकेशन्स, ब्लुटूथ आणि लोकेशन ट्रॅकिंग पुर्ण वेळ चालु राहणे गरजेचे आहे.📱

✅ *रुग्ण गृह विलगीकरणात असताना १ टक्के सोडियम हायपोक्लोराईटच्या* साहाय्याने सतत संपर्कात येणाऱ्या गोष्टी उदा : स्विच बोर्ड, खिडक्या, दरवाजाचे नॉब, खुर्ची, जेवणाचे टेबल, कपाट इ. साफ व निर्जंतुक कराव्यात. 

*या सर्व अटी व शर्थी सहित सर्व गोष्टींची पुर्तता होत असल्यास आपण कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे घरच्या घरी उपचार करू शकतो. जर आपल्याकडे या सर्व सुविधा उपलब्ध होत नसतील तर आपण कोविड केअर सेंटर मध्ये आपण उपचार घेऊ शकता...*

त्यामुळे अजिबात घाबरू नका, घरच्या घरी सुद्धा उपचार शक्य आहेत, 80% रुग्ण हे असेच बरे होत आहेत, परंतु त्यांना 14 ते 21 दिवस कठोरपणे विलगिकरण करणे गरजेचे आहे. 

      *बाकीचे जे मध्यम व तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी ऑक्सिजन बेड असणाऱ्या सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटल्स मध्ये उपचार करून घ्यावेत, 97% रुग्ण बरे होत आहेत, त्यामुळे कोणत्याही अफवा, भीतीदायक चुकीच्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका, आजार अंगावर अजिबात काढू नका, वेळेत उपचार केलेले सर्व रुग्ण बरे होत आहेत*... 
 🇮🇳🙏🇮🇳

- *डॉ अमोल पवार*
पुणे पदवीधर उमेदवार
9860111046 पलूस ( सांगली)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.