STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

कोरोनाची ही लढाई जोपर्यंत लोकांची जनचळवळ होत नाही, तोपर्यंत यावर नियंत्रण अशक्य...

*कोरोनाची ही लढाई जोपर्यंत लोकांची जनचळवळ होत नाही, तोपर्यंत यावर नियंत्रण अशक्य...*
        - डॉ अमोल पवार

ही लढाई प्रशासनच्या हातातून कधीच निसटून गेलेली आहे... जोपर्यंत समाजात राहणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर ही लढाई स्वतःची लढाई बनवत नाही, तोपर्यंत यावर विजय मिळवणे खूप कठीण ....

100 वर्षांपूर्वी 1918-1919 साली स्पॅनिश फ्लूच्या जागतिक महामारीमुळे जगातील एकूण 50 करोड लोक संक्रमित झालेली होती, त्यावेळी 5 करोड लोक मृत्युमुखी पडली होती, हा इतिहास आहे... सध्या ज्यापद्धतीने या कोविड 19 आजाराचा संसर्ग सर्व जगभर वाढत आहे, आटोक्यात आलेल्या युरोपियन देशात सुद्धा पुन्हा दुसरी लाट येत आहे. सध्या ज्याप्रमाणे या आजाराचे संक्रमण चालू आहे, हे येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी करणार आहे हे नक्की. सध्याचा आपल्याला दाखवीत असलेला हा मृत्यूचा आकडा सरकारी आहे, अनधिकृत किती लोक मरत आहेत याच कोणीही गणित मांडू शकत नाही, पुढील वर्षी 2021 रोजी होणाऱ्या जनगणनेतच हे स्पस्ट होईल की 2020- 21 मध्ये किती लोकसंख्या कमी झालेली आहे. हे खूप भयानक व चिंताजनक आहे...

कृपा करून सर्वांनी या महामारीची भयानकता ओळखा. सत्तेत आणि विरोधात असणाऱ्या लोकांनी जर या कोरोनाच्या जागतिक महामारीला न महत्व देता अजूनही फालतू व घाणेरड्या राजकारणात देशाला अडकून ठेवले तर लाखो लोकांची जीवितहानी अटळ आहे हे लक्षात घ्या. एक जबाबदार डॉक्टर म्हणून माझी सर्वाना विनंती आहे की स्वतःच्या कुटुंबाबरोबर स्वतःच्या समाजाची आणि आपल्या गावाची काळजी घ्या... सध्या  बाकीच्या एकूनएक ( पैसा, प्रॉपर्टी, सोन, पद, प्रसिद्धी, राजकारण)  सर्व गोष्टी निरर्थक आहेत...

- डॉ अमोल पवार

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.