STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

🇮🇳 कोरोनाच्या महाभयंकर संकटात मी एक सामान्य माणूस म्हणून कोणकोणती मदत करू शकतो ?




 

1️⃣ *सकारात्मक प्रबोधन*- दिसेल त्या लोकांना नाकावर मास्क लावण्याचे आवाहन करणे, त्यांना मास्क लावण्यास बाध्य करणे. मास्क शक्यतो चांगल्या प्रतीचा लावण्यास सांगणे, 
     
     ताप, थंडी वाजणे, सर्दी इत्यादी किरकोळ वाटणारे आजार अंगावर काढू नका याचे प्रबोधन करा, ताबडतोब संबंधित डॉक्टरना भेटून योग्य तो सल्ला व उपचार करून घेण्यास लोकांना बाध्य करणे, 

    कोरोना विषयक शास्त्रीय खरी माहिती आत्मसात करून ती सकारात्मक पद्धतीने इतरांना सांगणे व प्रबोधन करणे.
      
2⃣ *कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मदत* - कोरोना बाधित कुटुंबांना वाळीत न टाकता, त्यांना काही अन्नधान्य, भाजीपाला इत्यादी लागत असेल तर त्यासाठी त्यांना मदत करा, त्यांना घराबाहेर अजिबात पडून देऊ नका, त्यांच्या आजाराची तीव्रता लक्षात घेऊन त्यांना वेळेत योग्य त्याठिकाणी उपचार घेण्यासाठी बाध्य करणे,

3⃣ *ऑक्सिजन लेव्हल तपासणी* - चांगल्या क्वालिटीचा पल्स ऑक्सिमिटर घेऊन आपण आपापल्या भागातील लोकांचे रोजच्या रोज ऑक्सिजन लेवल पहा, व ज्यांची ऑक्सिजन लेवल 94 % पेक्षा कमी आहे त्यांना वेळेत ऍडमिट करण्यासाठी बाध्य करा. 

4⃣ *हॉस्पिटल बेड, इंजेक्शन इतर  माहिती* - आपल्या भागातील बेडची, इंजेक्शन व इतर गोष्टींची उपलब्धता रोज लक्षात घेऊन त्याची माहिती गरजू कोविड पेशंटना निस्वार्थी पणे  द्या. 

5⃣ *स्वयंसेवक*- लसीकरण झालेल्या निरोगी व्यक्तींनी, योग्य ती पुरेपूर काळजी घेऊन आपआपल्या भागातील कोविड सेंटर किंवा हॉस्पिटल्स मध्ये मदतनीस म्हणून काम करायला सुद्धा काहीही हरकत नाही, 

 6⃣ लॉक डाऊन मुळे ज्यांना जेवणाची सुद्धा सोय नाही अशांना आपण त्याची तजवीज करण्यासाठी प्रयत्न करावेत. 

7⃣ ही कामे करीत असताना आपण स्वतःची व आपल्या घरातील सर्व व्यक्तींची पुरेपूर काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे... 

8⃣ ज्यांना यापैकी काही जमत नसेल त्यांनी रोज आपल्या मोबाईल वरून आपल्या नातेवाईक, मित्र  किंवा ओळखीच्या लोकांना फोन करून वरीलप्रमाणे सकारात्मक माहिती देऊन धीर देण्याचे सुद्धा काम करू शकता... 

9️⃣ आपल्याला काहीच करायचे नसेल तर कृपया चुकीच्या, अशास्त्रीय, नकारात्मक बातम्या पसरवू न देण्याचे काम तर करू शकता...  

🔟 आपल्याला काहीच जमत नसेल तर कृपया या काळात शांतपणे घरात बसून राहा. नकारात्मक गोष्टी, काड्या घालणे, किंवा आरोग्य यंत्रणेत व प्रशासकीय यंत्रणेत मनापासून निस्वार्थीपणे काम करणाऱ्या लोकांना काहीही बोलू नये, शिव्याशाप देऊ नये, .. 

🙏🇮🇳🙏

- डॉ अमोल पवार 
     पलूस

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.