STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

😷 *कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपला जीव जाऊ नये असे वाटत असेल तर एवढं करा...* 🙏1️⃣ घराबाहेर पडताना नेहमी N95 मास्क लावा, मास्क नाकाबरोबर फिट हवा. गर्दीत जाऊ नका, आजारी माणसांपासून दूर राहा, घराबाहेर कोणत्याही परिस्थितीत मास्क नाकावरून काढून खाली घेऊ नका, फक्त 1 मिनिटं पुरेसा आहे इन्फेक्शन होण्यासाठी...  आपल्या राहायच्या घरात हवा खेळती राहील याची दक्षता घ्या. Vitamin C युक्त फळे खा, चांगला सकस व संतुलित आहार घ्या. पुरेशी झोप घ्या, प्राणायाम, योगा करा. 

2⃣ आपल्या प्रत्येकाच्या घरात एक चांगल्या क्वालिटीचा पल्स ऑक्सिमिटर असणे गरजेचे. रोज कमीतकमी 2-3 वेळा घरातील सर्व लोकांचे ऑक्सिजन पातळी पहा. शक्यतो 94%च्या वर 97-98% पाहिजे. 94%पेक्ष्या कमी ऑक्सिजन लेवल असणाऱ्या लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्काळ ऑक्सिजन बेड जिथे उपलब्ध असतील तिथे ऍडमिट करा. जेवढ्या लवकर आपण हा कोविड आजार निदान करून उपचार सुरू करू तेवढं आपल्यामध्ये कॉम्प्लिकेशन व्हायचे वाचतील. ऑक्सिजन पातळी80-85% पेक्षा कमी झाल्यावर व्हेंटिलेटर बेड शिवाय आपण ऍडमिट करू शकत नाही.. आणि असे पेशंट्स वाचवणे,कोणत्याही हॉस्पिटलमध्ये खूप मुश्किल असते,

3⃣ ताप, थंडी, सर्दी, खोकला, अंगदुखी ही किरकोळ लक्षणे समजून आजार अंगावर काढू नका. पहिल्या 2-3 दिवसात ही लक्षणे येतात, काहींना चव व वास जाणे, पोटात दुखणे, संडासला बिघडणे, डोळे लाल होणे  हेही लक्षणे दिसू शकतात. डॉक्टर्सना न दाखवता, जर ही लक्षणे तशीच अंगावर काढली तर 7-8 दिवसानंतर ऑक्सिजन पातळी खूप कमी येण्याची शक्यता असते. आणि जर ऑक्सिजन पातळी 80-85% पेक्ष्या कमी झाली तर त्यावेळी तुम्हाला इमर्जन्सी व्हेंटिलेटर बेडवर ऍडमिट करण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून वरील लक्षणे अंगावर न काढता, ताबडतोब संबंधित तज्ञ डॉक्टरना दाखवून अँटीजन किंवा RT PCR तपासणी व बेसिक रक्ताच्या तपासणी करून आजाराचे निदान व त्याची तीव्रता समजून घेणे गरजेचे असते. 80-90% लोकांमध्ये आपल्याला घरातच उपचार देऊन, CLOSE MONITERING करून बरे केले जाते, जर आपल्याला पुढे त्रास होणार आहे असे दिसत असेल तर डॉक्टर आपल्याला ताबडतोब ऍडमिट होण्याचा सल्ला देऊ शकतात. ऑक्सिजन पातळी 90ते 94% मध्ये असताना ऍडमिट झालेले 99% लोक बरे होतात, व हा आजार पुढे वाढू शकत नाही, असा कोविड हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या बहुतांश डॉक्टरांचा अनुभव आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे अंगावर न काढता वेळेत उपचार घेणे, खूप खूप गरजेचे. 

4⃣ ताप आल्यापासून पहिल्या आठवड्यात आपण अँटीजन टेस्ट, RT PCR टेस्ट, CBC, CRP, एवढ्याच बेसिक तपासण्या करायच्या आहेत. CT स्कॅन हा 7-9व्या दिवशी करायचा आहे, दुसऱ्या आठवड्यात Covid मार्कर म्हणजे CRP, LDH, Sr. Fertitine, D-Dimer, IL6 अश्या टेस्टस करून पेशंटच्या आजाराची तीव्रता पाहणे गरजेचे असते..  

5⃣ वेळेत निदान करून लवकर उपचार सुरू करणारे 99% लोक वाचू शकतात. कृपया आपला जीव वाचविण्यासाठी वर दिलेल्या सर्व सूचना या pandemic काळात काटेकोरपणे पाळा.

धन्यवाद 
डॉ अमोल पवार

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.