STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

About-us


डॉ.अमोल पवार M.B.B.S,D.Ortho
  • प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते व अस्थिरोग तज्ञ-डॉ.पवार हॉस्पिटल,पलूस.
  • व्यवस्थापकीय प्रमुख- डॉक्टर्स कोविड हॉस्पिटल पलूस( DCH Palus)
  • सांगली,कोल्हापूर महापूरासंबधी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचे एकमेव याचीकाकर्ते.
  • प्रमुख -कराड-तासगांव महामार्ग संघर्ष समिती
  •  प्रमुख कार्यवाहक - डॉ.पवार हॉस्पिटल पूरग्रस्त मदत केंद्र
  • संस्थापक/ अध्यक्ष -आदर्श समाज परिवर्तन संस्था,पलूस.
  • माजी अध्यक्ष-आय.एम्‌.ए. व पलूस तालूका डॉक्टर्स असोशिएशन.
  • निमंत्रक-लोकशाही वाचवा कृतीशील विचारमंच,पलूस.
  • माजी जिल्हाध्यक्ष - आम आदमी पार्टी, सांगली.
  • मार्गदर्शक - ज्ञानसाधना सार्वजनिक वाचनालय येळावी
  • संयोजक- आदर्श व स्मार्ट येळावी संकल्प ग्रुप
► मार्च - २०२०
कोरोना विरोधाच्या लढाईत तन, मन आणि धनाने मदत - यावर्षी स्वतः 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणगी, इतर सर्व हॉस्पिटल बंद असताना,आपल्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून निरंतर वैद्यकीय  सेवा, कोरोना बाबत सतत स्वतः अपडेट राहून विविध देशातील परिस्थितीचा अभ्यास करून सर्वसामान्य जनतेला अत्यन्त सोप्या भाषेत कोरोना विषयक सातत्याने प्रबोधन चालूच आहे, तसेच पलूस सारख्या ग्रामीण भागात, सर्व डॉक्टर्सच्या मदतीने कोरोना महामारीच्या काळात 12 व्हेंटिलेटर बेडसहित 50 आय सी यु बेडचे अद्यावत डॉक्टर्स कोविड हॉस्पिटल उभारण्यात महत्वपूर्ण सहभाग व प्रमुख व्यवस्थापकीय संचालक ...
 
► ऑगस्ट - २०१९
 महापुरातील बहुमूल्य योगदान - आपल्या आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ट्रस्ट च्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील चोपडेवाडी व सुखवाडी ही गावे प्राथमिक पुनर्वसनसाठी दत्तक घेऊन पलूस तालुक्यात एकूण 1000 जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप,

अलमट्टी विरोधात महापूर संबंधी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका- पुन्हा पुन्हा महापूर येऊ नये म्हणून कायमस्वरूपी उच्चस्तरीय तज्ञ लोकांची समिती स्थापन करून, स्थानिक डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा सक्षम करून पूरग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन करण्याची मागणी.

► २०१८ पासून 
महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख- गुहागर विजापूर महामार्गात सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, तासगाव ,कवठेमहांकाळ या गावातील महामार्ग बाधित हजारो शेतकऱ्यांना त्यांची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी 2017 पासून गेली 4 वर्ष सातत्याने मोठी जनआंदोलन उभे करून व उच्च न्यायालयात 5 जनहित याचिका दाखल करून सर्वसामान्य लोकांसाठी लढाई सुरूच आहे,

► २०१७ -२०१८  
आम आदमी पार्टीचे माजी जिल्हाप्रमुख-  2017-2018 या कालावधीत सांगली महानगरपालिका निवडणुकीत ठराविक आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना निवडणुकित उतरवून प्रगल्भ राजकारणाची सुरुवात केली आहे...

लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच प्रमुख निमंत्रक- पलूस परिसर व एकूणच सांगली जिल्ह्यातील विविध पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून लोकशाही दिन, संविधान दिन साजरा करीत सर्वसामान्य लोकांच्या विविध प्रश्नांवर कृतिशील तोडगा काढण्याचा सातत्याने प्रयत्न.

► २०१२-२०१७
पलूस तालुका डॉक्टर्स असोसिएशन व IMA पलूसचे माजी अध्यक्ष- 2012 ते 2017 या कालावधीत IMA पलूस स्थापन करण्यापासून, डॉक्टर्स संघटनेच्या माध्यमातून विविध वैद्यकीय शिबीरे, रक्तदान शिबीर घेऊन सतत डॉक्टर्स लोकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने व...

► २०१५ -
आदर्श येळावी संकल्प - आपले मुळगाव आदर्श व्हावे यासाठी गावात ज्ञानसाधना वाचनालयाची, व व्यायामशाळेची निर्मिती, गावातील पाचही सरकारी शाळेमधील एकूण 27 तुकड्यांना डिजिटल सॉफ्टवेअर देऊन शाळा अद्यावत करण्यामध्ये सहभाग, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता अभियान यासारख्या सामाजिक उपक्रम करून गाव आदर्श करण्यासाठी मनापासून प्रयत्न, गणेश मंडळांना सामाजिक कार्यात सहभागी व्हायला लावण्यासाठी आदर्श गणेश मंडळ पुरस्कार.

► २०१0 -
आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ट्रस्ट च्या माध्यमातून दरवर्षी पलूस परिसरातील एकूण 35 शाळातील 70 विद्यार्थ्यांना गेली 7 वर्ष आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिले जातात, आदर्श व्यक्तिमत्त्व, आदर्श पत्रकार, आदर्श सामाजिक संस्था, आदर्श गणेश मंडळ पुरस्कार देऊन आपला समाज आदर्श व्हावा यासाठी मनोमन प्रयत्न..!



      ➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.