STAY WITH US

Dr.Amol Pawar - Doctor | Social Activist | Politician

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उभारते नेतृत्व..!

Flood-2019

डॉ.पवार हॉस्पिटल पूरग्रस्त मदत केंद्रातर्फे आजपर्यंत करण्यात आलेली कामे 


वैद्यकीय सेवा -  
दिनांक 6 ऑगस्ट पासूनच ( महापूर येत असतानाच)  पलूस येथील डॉ पवार हॉस्पिटल येथे पूरग्रस्त मदत केंद्र उघडण्यात आले, एक महिन्यासाठी, 31 ऑगस्ट पर्यंत पूरग्रस्तांना मोफत तपासणी व उपचार करण्यात आले, चोपडेवाडी गावातील पेशंटचे ऑपरेशन व ऍडमिटचे सर्व खर्च माफ करण्यात आले, हॉस्पिटलची रुग्णवाहिका रुग्णांना ने आण  करण्यासाठी व स्थलांतर करण्यासाठी मोफत देण्यात येत होती, पलूस तालुक्यातील विठ्ठलवाडी, रामनानंदनगर, खंडोबाची वाडी, माळवाडी, दुधोंडी या ठिकाणच्या रिलीफ कॅम्प मध्ये डॉक्टरांना लागणारी सर्व औषधे ( जवळजवळ 35 हजार रुपयांची)  स्वतः प्रथम विकत घेऊन पोहोच करण्यात आली, 
 ✅ पूरग्रस्तांना मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था-  
आमनापूर, बुर्ली, पुनदी, नागराळे, भिलवडी इत्यादी गावातील 35 ते 40 पूरग्रस्तांना आपल्या हॉस्पिटलमध्ये निवारा देण्यात आला, व आचारी लावून रोजच्या तीनही जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, एकूण 15 ते 20 दिवस ही व्यवस्था चालू होती, तसेच आपल्याकडे मदत घेऊन येणाऱ्या लोकांनाही जेवण दिले जात होते, तसेच जी जी लोक, स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी आले होते अश्या सर्व लोकांची, डॉक्टरांची सुद्धा आपल्याकडे राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली गेली होती, 
 ✅  प्राथमिक पुनर्वसन साठी गावे दत्तक घेतली - 
वरीलप्रमाणे आम्ही निस्वार्थीपणे काम करीत असल्याचे पाहून, पुणे मुंबई व इतरत्र असणाऱ्या आमच्या मित्रांनी आम्हाला आमच्या आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ट्रस्टच्या माध्यमातून मदत करण्यास सुरुवात केली, मदतीचा ओघ सुरू झाल्यावरच  व मदत कामातील प्रशासनाचा गोंधळ लक्षात आल्यावर आम्ही सुसूत्रपणे व नियोजनबद्ध मदत व्हावी यासाठी चोपडेवाडी गाव दत्तक घेतले, तश्या प्रकारे 10 ऑगस्ट रोजी चोपडेवाडी गावातील सरपंच व प्रमुख लोकांनी गाव दत्तकचे पत्र दिले, अश्याप्रकारे काम करीत असल्याचे कळताच दिव्य मराठी पेपरच्या सहकार्याने डॉ पवार हॉस्पिटल मदत केंद्रातर्फे सुखवाडी हे गावही 12 ऑगस्ट रोजी प्राथमिक पुनर्वसन साठी दत्तक घेण्यात आले.
 ✅ गावांचा सविस्तर सर्वे - 
13 व 14 ऑगस्ट रोजी प्रोफेशनल व्हिडिओग्राफी च्या साहाय्याने या दोन्ही गावाचा प्रथम सविस्तर सर्वे करण्यात आला. पडझड झालेली घरे, संपूर्ण पडलेली घरे, सार्वजनिक ठिकाणची अस्वच्छता, मोडतोड, पीक, मृत जनावरे अश्या सर्व गोष्टींचा सर्वे करण्यात आला, सर्वेच्या आधारे प्राथमिक नियोजन करण्यात आले. 
 ✅ मृत जनावरांची विल्हेवाट - 
चोपडेवाडी व सुखवाडी या 2 गावात एकूण 125 जनावरे दगावली गेली आहेत, अत्यन्त भयंकर अवस्थेत रस्त्याच्या कडेलाच ही जनावरे मृत्युमुखी पडली होती, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आलेला जेसीबी, पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामस्थ यांच्या मदतीने व लागणारे साहित्य उदा. 1 टन मीठ, औषधे तातडीने उपलब्ध करून मृत जनावरांची सर्वांच्या मदतीने प्रथमतः विल्हेवाट लावून दुर्गंधी दूर करण्यात आली, 
 ✅ गावाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण व स्वच्छता -  
पंचायत समिती पलूस येथून औषधे उपलब्ध करून, खाजगी एजन्सीच्या माध्यमातून, 3 दिवसाच्या अंतरातून प्रत्येकी 2 वेळा, प्रत्येक घराघरत जाऊन या दोन्ही गावात फॉगिंग व डास निर्मूलन करण्यात आले, तसेच आपल्या  ट्रॅक्टरच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक ठिकाणी 3 दिवसाच्या अंतराने प्रत्येकी दोन दोन वेळा फोलिडोल पावडरने दोन्ही गावात डस्टिंग करण्यात आले, यासाठीचा संपूर्ण खर्च म्हणजे डिझेल, पेट्रोल, व्यक्तींचा पगार याचा सर्व खर्च डॉ पवार हॉस्पिटल पलूस तर्फे देण्यात आला, गावातील बोरबन शाळा मुंबईवरून आलेल्या स्वयंसेवकांनी  आपल्या माध्यमातून स्वच्छ केल्या,  NSS आटपाडी कॉलेज, NSS झरे कॉलेज, पुणे, मुंबई , निंबळक, डॉ पवार हॉस्पिटल पलूस स्टाफ व डॉक्टर्स, येळावी, नंदुरबार या ठिकाणाहून आलेल्या स्वयंसेवकांनी दोन्ही गावात मिळून शक्य होईल तेवढी स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला, यासाठी आपल्या एसटीपी ट्रॅक्टरचा जरूर त्याठिकाणी वापर करण्यात आला, 
 ✅ स्थानिक वैद्यकीय सेवा - 
डॉ पवार हॉस्पिटलचे डॉ सागर मोकाशी हे चोपडेवाडी व सुखवाडी गावात स्वतः हजर राहून मोफत तपासणी व उपचार करीत होते, व गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी डॉ पवार हॉस्पिटल पलूस येथे पाठवत होते, पलूसमध्ये 31 ऑगस्ट पर्यंत चोपडेवाडी गावातील सर्व पेशंटच्या ऑपरेशन, ऍडमिट खर्च संपूर्ण माफ केला आहे. 
 ✅ पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाना समान किट तयार करून वाटप - 
 एका कुटुंबाला एक महिन्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, धान्य ( एकूण 32 वस्तू) अश्या एकूण 1000 किटचे विविध गावात वाटप. डॉ पवार हॉस्पिटल पलूस, खंडोबाचीवाडी येथील गोडाऊन, सुखवाडी येथील ग्रामपंचायत भवन या सर्व ठिकाणच्या असलेल्या धान्य व वस्तूची उपलब्धता पाहून त्यामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू टाकून 32 गोष्टींचे सर्वसमावेशक असे किट करण्यात आले. यासाठी आपल्याला एकूण 6 ते 7 लाख रु किमतीच्या, कमी असलेल्या विविध वस्तू खरेदी करायला लागल्या, गोंधळ न होता सर्वाना समान वाटप व्हावे या उद्देशाने सर्व ठिकाणी रोज 20 ते 25 महिला कामगार हजेरीने, अत्यन्त नियोजनबद्ध Sorting व पॅकेजिंग करून  5 ते 6 दिवसात हे 1000 किट तयार करण्यात आले, व वाटप करण्यात आले, 
चोपडेवाडी गावात 350 किट, 2 चादरी व, पाण्याचा बॉक्स , सुखवाडी गावात 325 किट, 1 चादर, नागराळे गावात 100 किट, आमनापूर गावात 80 किट, खंडोबाचीवाडी येथे 25 किट, पुनदी, बुर्ली, येळावी, धनगाव अश्या सर्व ठिकाणी मिळून 120 किट असे एकूण 1000 किट वाटप करण्यात आले, 
बिस्कीट पुडे पलूस तालुक्यातील मूकबधिर शाळा, अंध शाळा, आश्रम शाळा, जी प मराठी शाळा व सर्व रिलीप सेंटर यांच्यामध्ये एकूण 25-30 बॉक्स वाटण्यात आले, 
 ✅पशुखाद्य- 
पलूस डेपो, व सांगली पोलीस यांच्या तर्फे आपल्या मदत केंद्रामार्फत प्रत्येकी 20 किलो वजनाची एकूण 150 बॅग गरजू शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या आहेत, 

 ✅ शालेय साहित्य वाटप- 
जी प शाळा चोपडेवाडी येथे उद्योजक तांबट यांच्या कडून आपल्या मदत केंद्रातर्फे एकूण 61 विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, 6 वह्या पेन पेन्सिल असे किट वाटप करण्यात आले, या दोन गावातील 3 जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने, एकूण 3 वॉटर प्युरीफायर बसविण्यात येत आहेत.
 ✅ घरांचे पुनर्वसन-
प्रत्येक गावात 20 ते 25 % घरे अंशतः किंवा पूर्णपणे पडलेली आहेत, सांगली जिल्ह्यात एकूण 11000 घरे पडलेली आहेत, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या घरांचे संपूर्ण पुनर्वसन करणे ही सरकारचीच जबाबदारी आहे, तरी हे सर्व पुनर्वसन राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या नियमाप्रमाणे केंद्र व राज्य सरकारने करावीत यासाठी डॉ अमोल पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, 
 ✅ शासकीय स्तरावर पाठपुरावा- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राऊत यांना स्वतः भेटून या पलूस तालुक्यातील गावाचा तातडीने पुनर्वसन करण्याचा आराखडा तयार करून तो लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली, 
सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका- 
दिल्लीचे प्रसिद्ध वकील सचिन पाटील यांच्या सहकार्याने डॉ अमोल पवार यांनी खालील मुख्य मागण्यांसाठी जनहित याचिका दाखल केली आहे,
   1. पुन्हा पुन्हा महापुराचा धोका टाळण्यासाठी तज्ञ लोकांची आंतरराज्य समनव्य समिती स्थापन करावी, व पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.
  2.  राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या नियमाप्रमाणे शाश्वत व संपूर्ण पुनर्वसन व्हावे, 
  3.  स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्था मजबूत करण्यासाठी NDM च्या नियमाप्रमाणे सर्व गोष्टींची उपलब्धता व प्रशिक्षण द्यावे,
  4.  पूर प्रसंगी दुष्काळी भागात जास्तीत जास्त पाणी वळवावे. 
यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे व माहिती, तज्ञ लोकांच्याकडून उपलब्ध करून, विविध शासकीय संस्थांकडून माहिती अधिकार टाकून मिळवाव्या लागल्या आहेत, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याची दखल घेऊन तात्काळ केंद्र, राज्य, कर्नाटक, सरकार व जिल्हा प्रशासन यास नोटीस बजावली आहे,  जनहित याचिका पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे, हे नक्की..!
- डॉ अमोल पवार
आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संचलित 
डॉ पवार हॉस्पिटल पूरग्रस्त मदत केंद्र.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.