डॉ.अमोल पवार -
पुणे पदवीधर उमेदवार म्हणून जोरदार तयारी-
खरं पाहिलं तर, शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, प्राध्यापक, वकील व इतर पदवीधर असलेले सर्व व्यावसायिक क्षेत्रातील विचारवंत लोकांचे प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत असावं हा मूलभूत हेतू आपल्या संविधानाचा असताना विविध राजकीय पक्षांनी आपापले राजकीय प्रतिनिधी यामध्ये घुसविण्याचा असंविधनिक प्रयत्न आजपर्यंत केला आहे.
सर्वसामान्य पदवीधर लोकांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी डॉ अमोल पवार यांच्या सारख्या उच्चशिक्षित व सर्वच सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय काम करणारे व्यक्तिमत्वच या पदाला न्याय देऊ शकेल, आरोग्य क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, महापूर प्रश्न, महामार्गाचे प्रश्न, संविधान वाचवा असुदे किंवा सद्यस्थितीत असणारा कोरोना महामारीचा प्रश्न डॉ अमोल पवार यांनी कोणतीही सत्ता नसताना, सातत्याने हे सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत केला आहे, म्हणून सर्व पदवीधर लोकांचा लोकप्रतिनिधी डॉ अमोल पवार यांचा सारखा व्यक्ती असणं आज काळाची गरज आहे.
ऑनलाइन पदवीधर मतदार नोंदणी - पुणे पदवीधर मतदारसंघात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातील पदवी किंवा पदविका प्राप्त लोकांनी आपलं नाव पदवीधर मतदार म्हणून नोंद करून घेण्यासाठी खालील लिंक वर जाऊन ऑनलाईन पध्दतीने नोंद करू शकता....
–---------------------------–-------------------------------
पदवीधर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी लिंक -https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/
---------------------------------------------------------------